Viral Video On Social Media : इंटरनेटवर व्हिडिओची भरमार असते. इंटरनेटवर तुम्हाला हव्या त्या विषयावर, विविध पैलूंवरील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतील. काही व्हिडिओमध्ये नैसर्गिकरित्या अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल ( Viral Video)  होतो. असाच एक नवा व्हिडीओ आता समोर आलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आजचा दिवस बनला असं नक्की वाटेल ( Video of the day) . हा व्हिडीओ एका रिपोर्टरचा. रिपोर्टींग करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात ( Funny Reporting video) . पाकिस्तानच्या एका रिपोर्टरचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. आता आणखी एक रिपोर्टर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती लहान हत्तींच्या कळपात उभा राहून राहून रिपोर्टींग करताना पहायला मिळतो. मात्र या रिपोर्टरसोबत पुढे जे होतं ते पाहून तुम्हाला प्रचंड हसू येईल   


एकापेक्षा एक भन्नाट, मजेशीर व्हिडीओ...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट, मजेशीर व्हिडीओ शेअर होतात. हाही तसाच एक भन्नाट व्हिडीओ ( Social Media Videos) आहे. अशा प्रकारचे व्हिडीओ कायम नेटकऱ्यांना आवडतात. असा व्हिडीओ पाहायला मिळाला की आपला 'दिवस सार्थकी लागला' असं आपल्याला वाटू शकतं. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. 


रिपोर्टरसोबत घडलं असं काही


हत्ती हा सर्वात बुद्धिमानप्राण्यांपैकी एक प्राणी. हत्ती अत्यंत संवेदनशील देखील असतो. या व्हिडिओमध्ये जो रिपोर्टर आपल्याला पाहायला मिळतोय तो वयन्यजीव ट्रस्टबाबत माहिती सांगताना पाहायला मिळतो. हा रिपोर्टर आपलं रिपोर्टींग सुरु करतो. काही लाईन्स बोलतो तोवर सगळं ठीक असतं.अगदी काहीच वेळात एक छोटा हत्ती या रिपोर्टर जवळ येतो आणि तिथेच हा व्हिडीओ प्रचंड विनोदी होतो. आधी तुम्ही हा व्हायरल व्हिडीओ पाहा. 




रिपोर्टरची हत्तीसोबत मस्ती... 


या रिपोर्टरच्या मागे असणारा हत्ती रिपोर्टरसोबत मस्ती करण्याच्या मूडमध्ये आहे हे स्पष्ट पाहायला मिळतं. हा छोटा हत्ती सुरुवातीला या रिपोर्टरच्या कानावरून सोंड फिरवतो. त्यानंतर हा हत्ती डोक्यावरून सोंड फिरवताना पाहायला मिळतो. शेवटी या छोट्या हत्तीची सोंड थेट रिपोर्टरच्या नाकावर आणि चेहऱ्यावर जाते. नाकावर सोंड आल्यावर रिपोर्टरलाही राहवत नाही. हा रिपोर्टर आपलं रिपोर्टंग सोडून हसताना पाहायला मिळतो. शेल्ड्रिक वाईल्डलाईफ ट्रस्ट ही संस्था छोट्या हत्तीच्या रेस्क्यूसाठी आणि सोबतच प्राण्यांच्या बचावासाठी काम करणारी संस्था आहे. हा व्हिडीओ KBC संस्थेला सौजन्य देऊन आहे. 


व्हिडीओ पाहून नेटकरी झालेत लोटपोट...


या व्हिडिओमध्ये रिपोर्टर तर हसायला लागतोच. सोबतच  व्हिडीओने नेटकऱ्यांचं देखील प्रचंड मनोरंजन केलं आहे. या व्हिडिओवर लाखो व्ह्यूज आणि हजारो हजारोंनी कमेंट्स येत आहेत.