Man Tried To Steal Woman Purse: गेल्या तीन वर्षात देशातील गुन्हेगारीमध्ये (Crime News) मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र आहे. बेरोजगारी वाढत असल्याने गुन्हेगारी वाढत असल्याचा निश्कर्ष काढला जात आहे. मात्र, फक्त भारताताच नव्हे तर परदेशात देखील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतंय. अशातच सध्या एक व्हिडिओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चोरांचा डाव तुम्ही कधी फसल्याचं पाहिलंय का? अनेकदा सामान्य माणूस जशा चुका करतो, तशा चोराकडून देखील होत असतीलच की... अशातच एक भन्नाट व्हिडिओ ( Viral video of the thief ) समोर आलाय. नेमकं काय झालं पाहूया...


तर झालं असं की, महिलेची पर्स हिसकावून ( Man Tried To Steal Woman Purse ) घेण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती बसमध्ये चढला. महिला बसमध्ये चढताच त्या व्यक्तीने महिलेची पर्स हिसकावून घेण्याचा डाव आखला. पहिल्यांदा त्याने पर्स हिसकाण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा डाव फसला. त्यावेळी चुकून हात लागला, असं त्याने भासवलं. त्यानंतर त्याने दुसरा प्रयत्न केला. मात्र, यावेळी देखील तो अयशस्वी ठरला. मात्र, यावेळी त्याची चोरी (Steal Woman Purse On Bus) पकडली गेली. त्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न सुरू केला. चोर पळून जात असल्याचं लक्षात येताच चालकाने दरवाजा लावून घेतला. चालकाने डोकं लावलं अन् चोराची चोरी पकडली गेली.


आणखी वाचा - Crime News: मुलीचा अंघोळ करतानाचा अश्लील Video बनवला, ब्लॅकमेल करून OYO वर नेलं अन्...


ड्राईव्हरने (Bus Driver) एवढ्यावरच न थांबता थेट बाजूला ठेवलेलं दांडूक काढलं अन् चोरावर बरसात सुरू केली. न थांबता ड्राईव्हरने चोराला फटकवलं.  थोड्या वेळाने चोराचा चेहरा पार रडकुंडीला आल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. चोराला पकडल्यानंतर ड्राईव्हरने पोलिसांना अलर्ट जारी केला. थोड्याच वेळात जेव्हा बस थांबली तेव्हा पोलीस चोराचं स्वागत करण्यासाठी हजर होते. त्यानंतर पोलिसांनी महिलेची देखील चौकशी केली आणि चोराला ताब्यात घेतलं आणि खाकी दाखवली.


पाहा Video



दरम्यान, 122 सेकंदाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर आता नेटकऱ्यांनी कमेंट करण्यास सुरूवात केलीये. वाईट कर्माची फळं देव याच जन्मात देतो, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहेत. तर अनेकांनी,आपल्याला रोगीवर नाही तर रोगावर उपचार करायला हवेत, देशात बेरोजगारी वाढलीये, असं म्हणत शासनाला दोष दिलाय.