Robbery In Green Jumpsuits: मेट्रोमध्ये काही महिलांनी धुडगूस घातल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सदर घटना अमेरिकेतील नूयॉर्क मेट्रोमधील असल्याचं समोर आलं आहे.  अचानक लुटारूंची टोळी मेट्रोमध्ये घुसली आणि लुटमार सुरु केली. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिला लुटारूंची टोळी मेट्रोमध्ये विचित्र सूट परिधान घालून घुसली. निऑन जंपसूट घातलेल्या सहा महिलांच्या टोळीने प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडिया पोस्टनुसार ही घटना रविवारी दुपारी 2 वाजता टाइम्स स्क्वायर येथे मेट्रोमध्ये घडली. महिलांनी 19 वर्षीय दोन तरुणींवर हल्ला केला. तरुणींकडून सेलफोन, क्रेडिट कार्ड, पर्स आणि अन्य सामान हिसकावून घेतलं. या प्रकरणी तरूणींनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 



पीडितेच्या आईने सांगितले की, तिची मुलगी फ्लोरिडा येथील एका महाविद्यालयात काम करते. क्वीन्समधील कुटुंबाला भेटण्यासाठी ती विकेंडला घरी परतत होती. आपल्या मुलीला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. दरोडेखोर महिला अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितलं असून तपास सुरु आहे.