`देवच माझी रक्षा करेल,` म्हणत पादरीने सिंहांच्या पिंजऱ्यात मारली उडी; खेचला सिंहाचा कान अन् पुढच्या क्षणी...
दक्षिण आफ्रिकेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एका पादरीने सिंहाच्या पिंजऱ्यात उडी मारली आहे. देव आपली रक्षा करत असल्याचं सिद्ध करण्यासाठी त्याने हे कृत्य केलं.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यात एक फार नाजूक अशी रेष असते. आपण या रेषेच्या नेमक्या कोणत्या बाजूला उभे आहोत हे समजून घेणं गरजेचं असतं. देवावरील याच श्रद्धेपोटी अनेकदा लोक आपली बुद्धी न वापरता सर्रासपणे अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. तसंच देवावरील आपली श्रद्धा किंवा देव अस्तित्वात आहे हे दाखवण्यासाठी मर्यादाही ओलांडतात. मग त्यातून एखादा मूर्खपणा करत आपला जीव धोक्यात घातला जातो. यातील काहीजण तर आपल्यावर देवाचा वरदहस्त आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नात हा मूर्खपणे करत असतात. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेत एका पादरीने देवाच्या नावाखाली जे काही केलं ते सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारं होतं. @mufasatundeednut या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. यामध्ये निळ्या रंगाच्या सूटमध्ये असणारा पादरी चक्क सिंहाच्या पिंजऱ्यात बसलेला दिसत आहे. या पादरीचं नाव डॅनिअल असं आहे.
व्हिडीओत डॅनिअल हा सिंहाच्या पिंजऱ्यात बसलेला दिसत आहे. यावेळी त्याच्याभोवती तिन सिंह खाली बसलेले असतात. यादरम्यान तो कधी सिंहाचा कान खेचत आहे, तर कधी त्यांच्या तोंडात हात टाकत आहे. पादरी सिंहाच्या पिंजऱ्यात बसलेला असताना बाहेर उभे असणारे लोक आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असतात. या लोकांना त्यानेच आणलेलं होतं. हे सर्वजण त्याचे फॉलोअर्स आहेत.
हा व्हिडीओ पाहताना सुरुवातीला ही व्यक्ती लाइन मास्टर असावी असं वाटू शकतं. पण आरामशीर बसलेली ही व्यक्ती पादरी आहे. देव आपली रक्षा करत असून, हे सिंह आपलं काहीच करु शकत नाहीत हे सिद्ध करण्यासाठीच त्याने सिंहांच्या पिंजऱ्यात उडी मारली होती. पिंजऱ्यात गेल्यानंतर बाहेर उभ्या आपल्या चर्चमधील सदस्यांना तो हे वारंवार दाखवण्याचा प्रयत्न करत होता.
आफ्रिकेत पादरी अनेकदा ब्रेनवॉश कऱण्यासाठी अशा प्रकारची कृत्यं करत असतात. आपल्यावर देवाचा आशीर्वाद असून, आपल्याकडे अशी शक्ती आहे जी सर्वसामान्य व्यक्तीकडे नाही हे सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण पादरी डॅनियलने जे काही केलं, ते सर्वात धोकादायक होतं.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एकाने म्हटलं आहे की, असे लोक धर्माला फक्त एक मस्करी बनवतात. तर एकाने लिहिलं आहे की, देवाच्या नावाखाली भक्तांना मूर्ख बनवणं आता बंद करा. तसंच एका युजरने कमेंट केली आहे की, एखाद्याला मूर्ख बनवण्यासाठी तुम्ही नेमक्या कोणत्या पातळीवर जाणार आहात?