Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. नसतं धाडस कसं अंगाशी येऊ शकतं हे व्हिडिओतून दिसतंय. आतापर्यंत आपण पायाखालची जमीन सरकली, अशी म्हण अनेकवेळा ऐकली असेल. पण प्रत्यक्षात अशी घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अंगाचा थरकाप उडेल अशी ही घटना आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मगरीबरोबरचं फोटोसेशन पडलं महाग
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत काही लोकं मेलेली मगर (Crocodile) समजून तिच्याबरोबर फोटो (PhotoShoot) काढण्यात मग्न असल्याचं दिसत आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. मगर पाणी आणि जमिनवर राहाणारा अत्यंत धोकादायक जीव आहे. पण मगर बहुतेकवेळ पाण्यात असतात. पाण्यातून बाहेर आल्यानंतर तोंड उघडून मगर एकाच स्थितीत अनेक तास उन्हाचा आनंद घेत पहुडलेल्या असतात. 


अशीच एक मगर तोंड उघड ठेवून शरीराची जराही हालचाल न करता पडून होती. काहीच हालचाल करत नसल्याने तिथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ती मगर मेली आहे असं वाटलं. काहीतरी वेगळ करायचं म्हणून काही लोकांनी मगगरीबरोबर फोटोशूट करण्याचं धाडस केलं. एकाचं बघुन दुसरा तिसरा असे काही जण फोटो आणि व्हिडिओ बनवू लागले.


मगरीने केला हल्ला
व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे एक महिला आणि एक पुरुष मगरीच्या मागे बसून फोटो काढताना दिसत आहेत. त्याच वेळी आणखी एक महिला मगरीच्या तोडांजवळ जाऊन फोटो काढताना दिसत आहे. त्या महिलेने मगरीच्या पाठिवर हात ठेवला आणि त्याचवेळेस मगरीने अचानक त्या महिलेवर जीवघेणा हल्ला केला. मेलेली मगर समजून तिच्या फोटो काढण्यासाठी जमलेल्या लोकांची अचानक झालेल्या हल्ल्याने आरडाओरडा सुरु झाली. 


व्हिडिओ होतोय व्हायरल
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर earth.reel या नावाने हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून आतापर्यंत 50 हजाराहून जास्त वेळा व्हिडिओ जास्तवेळा बघितला गेलाय. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Earth Reels (@earth.reel)


मगरीच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर मगरीच्या हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ  @TerrifyingNatur नावाने इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत एक शेतकरी हार्वेस्ट मशिनने शेतातील पाणी काढत असातना अचानक त्या मशिनवर एका मगरीने हल्ला केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ जवळपास 60 लाख लोकांनी पाहिला आहे. तर 79 हजाराहून अधिक जणांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे.