Video व्यवस्थित पाहा... चीनच्या आकाशात दिसले 7 सूर्य; हा चमत्कार की आणखी काही?
Viral Video : आभाळात सात सूर्य वगैरे वगैरे अशा संकल्पना अनेकदा अलंकारिक स्वरुपात पाहायला मिळतात. पण, अशीच एक घटना प्रत्यक्षात घडलीये...
Viral Video : सोशल मीडियावर आता दर दिवशी नव्हे, तर दिवसातून प्रत्येक तासाला एक नवा व्हिडीओ व्हायरल होत असतो. अनेकदा तर काही मुद्द्यांवर जुने व्हिडीओसुद्धा तितक्याच वेगानं व्हायरल होतात. सध्या अशाच एका व्हिडीओची इंटरनेटवर सर्वदूर चर्चा सुरू आहे. प्राथमिक स्वरुपातील माहितीनुसार हा व्हिडीओ चीनमधील असल्याचं सांगण्यात येतं.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसणारी दृश्य व्यवस्थित पाहिल्यास लक्षात येतंय की इथं एकदोन नव्हे, तर तब्बल 7 सूर्य दिसत आहेत. अनेकांनीच हा व्हिडीओ पाहून, तो चमत्कार आहे की काय? असे भारावणारे प्रश्नही विचारले आहेत.
सोशल मीडियावरील माहितीनुसार हा व्हिडीओ 18 ऑगस्टचा असून, चेंग्दू येथील एका रुग्णालयातील महिलेनं ही झलक टीपल्याचं म्हटलं जात आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी दृश्य म्हणजे ब्रह्मांडाचं एक अनपेक्षित रुपच असल्याचं म्हटलं आहे. पण, त्यामागचं नेमकं सत्य माहितीये?
हा व्हिडीओ म्हणजे कोणता चमत्कार नसून ते एक ऑप्टीकल इल्यूजन आहे (Optical Illusion). कारण, हा व्हिडीओ महिलेनं रुग्णालयाच्या खिडकीतून टीपला आहे. खिडकीला असणाऱ्या काचेच्या प्रत्येक थरामध्ये सूर्याची झलक परावर्तित झाली आणि प्रकाशाच्या याच गुणधर्मामुळं एकाच वेळी फोटोमध्ये सात सूर्य दिसले. थोडक्यात ही कमाल विज्ञानामुळं झाली असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
हेसुद्धा वाचा : प्रेशर कुकरमध्ये शिजवलेली डाळ आरोद्यासाठी फायदेशीर की धोकादायक? सत्य वाचा सजग व्हा!
नैसर्गिकरित्या आणि अतिशय अनपेक्षितपणे झालेल्या या ऑप्टीकल इल्युजनला पाहून तुम्ही काय म्हणाल? जाणून आश्चर्य वाटेल पण, चीनमध्ये या व्हिडीओचा थेट संबंध एका धारणेशी जोडला गेला. चीमध्ये अशी धारणा आहे, की तिथं एक तीरंदाज होता. ग्रहाला पेट घेण्यापासून वाचवण्यासाठी म्हणून पृथ्वीवरील 10 पैकी 9 सूर्य मारले होते... बस्स ही दंतकथा चीनमध्ये यानिमित्तानं पुन्हा चर्चेचा विषय ठरली.