Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी बनवले जातात. तर काही घडलेल्या घटनेंचा व्हिडीओ असतो. प्राण्याचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर पाहिला मिळतात. त्यात अनेक जंगली प्राण्याचे थरकाप उडवणारे व्हिडीओ असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो सगळ्या यूजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. 


काळजाचा ठेका चुकविणारा व्हिडीओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाघाची भीती वाटत नाही असा म्हणणारा एकही माणूस सापडणार नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता बस चालक बसची खिडकी उघडून वाघाला निमंत्रण देतो. बस चालकाचं हे धाडसी कृत्य पाहून अंगावर काटा येतो. या व्हायरल व्हिडीओमधील हा बस चालक वाघाला काही तरी दाखवतो आणि आपल्याकडे येण्याचं निमंत्रण देतो. हा व्हिडीओ तुम्ही नीट पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की,  बसचालकाच्या हातात लॉलीपॉप सारखं काहीतरी पदार्थ आहे. 


लॉलीपॉप पाहून तो वाघ त्या बस चालकाकडे येतो आणि झटकन तो खाऊन टाकतो. हे दृष्य पाहून क्षणासाठी काही समजत नाही. हा व्हिडीओमधील बस एक नॅशल पार्कमधील आहे. नॅशलन पार्कमध्ये प्राण्यांना अशाप्रकारे मांस दिले जाते. या बस चालकांना यासंदर्भात ट्रेनिंग दिली जाते. त्यामुळे तुम्ही कधी जंगलात गेल्या तर असे काही धाडस करु नका. 


हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्यापासून आतापर्यंत 28 हजारहून अधिक यूजर्सने पाहिला आहे. तर 35 हजारांपेक्षा जास्त यूजर्सने तो लाइक केला आहे.