Viral Video News : सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रस्त्यावर काही जण विचित्र प्रकारे हावभाव करत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. झोम्बी व्हायरसमुळे (Zombie Virus) या लोकांची असी अवस्था झाली आहे की आणखी काही, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय. या व्हिडिओत काही लोकं आपल्याच विश्वात मग्न होऊन बराच वेळ एकाच अवस्थेत उभे असलेले दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. युझर्स (Users) यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी तर याचा संबंध झोम्बी व्हायरसची जोडला आहे.


काय आहे त्या व्हायरल व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओत एक व्यक्ती रस्त्यावर अशा पद्धतीने उभा आहे की कधीही बसेल असं वाटतं, पण तो त्याच अवस्थेत बराचवेळ उभा असल्याचं दिसत आहे. त्याच व्हिडिओत आणखी एक महिलाही दिसतेय, ती महिलाही विचित्र हावभाव करत हलताना दिसत आहे. तर एक व्यक्ती समोरच्या बाजूला झुकलेला दिसत असून तो कोणत्याही क्षणी कोसळेल असं दिसंतय. त्यांच्या अशा वागण्याने लोकं हैराण झाली आहेत. 



हे ही वाचा : Shocking News : शेवटची एक धाव, सामन्याची आणि आयुष्याचीही... 16 वर्षाच्या मुलाचा क्रिकेटच्या मैदानातच मृत्यू


काय आहे नेमकं प्रकरण?
हा व्हिडिओ अमरिकेतल्या फिलाडेल्फिया (American Philadelphia) इथला असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अशा घटना इथे वारंवार घडत असतात. यामागचं कारणही धक्कादायक आहे. अंमलीपदार्थांच्या नशेमुळे या लोकांची अशी अवस्था होते. अंमलीपदार्थांचा प्रभाव जास्त झाला की यांचा स्वत: वरचा ताबा सुटतो आणि मग नशेच्या अंमलाखाली त्यांच्याकडून असे प्रकार घडत असल्याचं इतले स्थानिक लोकं सांगतात. 


हा व्हिडिओ @dammiedammie35 या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यासोबत त्याने लिहिलंय अमेरिकेत हे काय होत आहे.