देवमाशाची उलटी विकली जातेय करोडो रुपयांना; थायलंडचा मच्छिमार मालामाल
निळा देवमाशाची ( Whales ) उलटी करोडो अब्जोमध्ये विकली जाते. हे ऐकायला तुम्हाला कितीही आश्चर्य वाटत असले तरी हे सत्य आहे.
मुंबई : महासागरात राहणारा जगातील सर्वात मोठा मासा म्हणजेच निळा ( Whales ) देवमासा होय. या माशाची उलटी करोडो अब्जोमध्ये विकली जाते. ऐकायला तुम्हाला कितीही आश्चर्य वाटत असले तरी हे सत्य आहे. देवमाशाची उलटी जर कोणाला पाण्यावर तरंगताना दिसली तर त्याचे नशीब उघडले असे समजा. थायलंडमधील एका मच्छिमाराला 100 किलो देवमाशाची उलटी मिळाली आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की तो मच्छिमार किती मालामाल झाला असेल!
निळ्या देवमाशाची उलटी (vomit) काय असते?
देवमाशाच्या शरीरातून निघणारा मैला म्हणजेच उलटी असते. खरे म्हणजे देवमाशाच्या पोटात मैला जमा होतो. तो काही वेळा खुप जास्त झाल्याने हा मैला देवमासा तोंडावाटे बाहेर काढतो. यालाच देवमाशाची उलटी म्हणतात. वैज्ञानिक त्याला ambergris असे म्हणतात. ambergris चा गंध मैलासारखा असतो. कालांतराने हा गंध मातीसारखा होत जातो.
उलटीला तरंगणारं सोनं का म्हणतात?
देवमाशाच्या उलटीचा वापर परफ्युम इंडस्ट्रीमध्ये केला जातो. या उलटीत असलेल्या अल्कोहोलचा वापर परफ्युम बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे ही उलटी करोडो रुपयांना विकली जाते. देवमाशाची उलटी पाण्यावर तरंगत असल्यामुळे त्याला पाण्यावर तरंगणारे सोने ( gold ) असेही तज्ज्ञांकडून म्हटले जाते. थायलंडमध्ये ज्या मच्छिमारांना देवमाशाची उलटीचा टणक झालेला तुकडा मिळाला आहे. त्याची गुणवत्ता उत्तम असल्याने एका कंपनीने त्यांना 25 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. काही देशांमध्ये ambergris ची सुगंधित अगरबत्तीसुद्धा बनवली जाते. त्यामुळे जगभरातील बाजारात त्याला चांगली मागणी आहे.