Men will be men! समुद्रकिनारी नवरा बिकिनीतील मुलींचे Video काढतनाच बायको आली अन्...
Viral Video : समुद्रकिनारी नवरा बिकिनीतील मुलींचे Video काढत असताना अचानक तिथे बायको आली. त्याचं हे कृत्य बायकोने पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Husband Wife Video : सोशल मीडियाचा जगात साथीदाराची फसवणूक करणाऱ्या काही पुरुष किंवा महिलांचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. जेव्हा आपण नवऱ्यासोबत किंवा बॉयफ्रेन्डसोबत घराबाहेर पडतो. अनेक महिलांना किंवा तरुणींना हा अनुभव नक्कीच आला असले.
Men will be men!
कुठेही फिरायला जा किंवा अगदी मार्केटमध्ये भाजी खरेदी करायला गेले तरी काही पुरुषांचे डोळे हे इथे तिथे असलेल्या इतर महिला, तरुणींकडे फिरतात. त्यांचं सौंदर्य पाहण्यात ते व्यस्त असतात. बायको किंवा गर्लफ्रेन्ड शेजारी असली तर त्यांचं लक्ष मात्र दुसरीकडे असतं. म्हणून महिला कायम म्हणतात Men will be men.
अन् अचानक बायको आली!
सोशल मीडियावर अशा एका नवऱ्याला बायकोने रंगेहात पकडले आहे. या व्हिडीओमध्ये नवरा बायको समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले असताना बायकोने नवऱ्याचे ते कृत्य रंगेहात पकडले. तु्म्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता किनाऱ्यावर बिकिनीमध्ये तरुणी सुमद्रात मजा करत असतात. अशात नवरा कॅमेरा काढतो आणि निळ्या पाण्याचे निसर्गरम्य सौंदर्य टिपतो. बायकोला पहिले वाटतं तो खरंच निसर्गरम्य दृश्यं कॅमेऱ्यात कैद करत आहे. (viral wife caught red handed husband recording video beach girls in hot bikini trending news on Social media)
पण त्याचा कॅमेरा हळू हळू उजवीकडे वळतो आणि मध्येभागी त्याचा कॅमेरा पॅन करणे थांबतो. महिलेला शंका येते आणि ती त्याला बिकिनीतील तरुणीला कॅमेऱ्यात कैद करताना रंगेहात पकडते. या व्हिडीओमध्ये बायकोच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून लक्षात येतं आता त्या नवऱ्याचं काही खरं नाही.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्विटरवर द फिगेनने शेअर केला आहे. हा व्हिडी सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. या व्हिडीओवर नेटिझन्सने मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओवर कंमेंट्सचा पाऊस पडतोय. सोशल मीडियावर नवऱ्याला दुसऱ्या मुलीसोबत बायकोने पकडल्याचे अनेक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एका व्हिडीओमध्ये तर नवरा आणि त्याचा प्रेयसीला बायकोने रंगेहात पकडल्यावर त्या प्रेयसीवर भरदिवसा टॉवेलवर पळण्याची वेळ आली होती. एका व्हिडीमध्ये तर प्रेयसी घराच्या बाल्कनीत लपलेली दिसून आले होती. या सगळ्या घटना कोणी तरी कॅमेऱ्यात कैद केल्या नंतर त्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या.