मुंबई : पाकिस्तानक़डून ६ सप्टेंबर हा संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. पाकिस्तान भारताविरूद्ध एकही युद्ध अजून जिंकू शकलेला नाही, दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान जेवढे क्रिकेट सामने झाले, त्यात जास्तच जास्त वेळा भारताकडून पाकिस्तानचा पराभव झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण पाकिस्तानी मुलांनी ६ सप्टेंबर या पाकिस्तानच्या संरक्षण दिनाचं औचित्य साधून एक व्हिडीओ तयार केला आहे.  यात पाकिस्तानने संपूर्ण भारत जिंकला असल्याचं दाखवलं आहे. हा व्हिडीओ म्हणजे 'शादी मत करो, लेकीन शादी की बाते तो करो' असाच आहे. या व्हिडीओला भारतीय यूट्यूबर खणखणीत व्हिडीओ बनवून उत्तर देतील असं म्हटलं जात आहे.


यात टीव्हीसमोर काही पाकिस्तानी मुलं बसली आहेत. ते क्रिकेटचा सामना पाहत आहेत. टीव्हीतला सामना श्रीनगरमध्ये खेळला जात आहे. पाकिस्तानी टीमचे ओपनर बॅटसमन आहेत, बाबर आझम आणि विराट कोहली. म्हणजेच टीम इंडियाचा विराट देखील पाकिस्तान टीमकडून खेळेल, जेव्हा आम्ही भारतावर विजय मिळवू, असं हे भंगार स्वप्न पाकिस्तानी व्हिडीओच्या माध्यमातून दाखवत आहेत.


याच्याशी संबंधित एक ट्वीटरवर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात पाकिस्ताननी यूट्यूबर्सने एक विचित्र कल्पना व्हिडीओत साकारली आहे. खरंतर प्रत्यक्षात हे शक्यच नाही, विशेष म्हणजे विराट कोहली पाकिस्तान टीमकडून खेळत असल्याचं या व्हिडीओत कॉमेन्टेटर सांगतोय. खरं तर हा व्हिडीओ पाहून पाकिस्तानची कीव येते आणि हसू देखील येतं.


हा विचित्र व्हिडीओ, नाईला इनायत या पाकिस्तानी पत्रकाराने शेयर केला. तिने कॅपशन दिले आहे, 'पाकिस्तानी क्रिकेट टीम श्रीनगरमध्ये खेळतेय, पाकिस्तानी टीममध्ये विराट देखील आहे, हा एक काहीसा भ्रम आहे दुसर काही नाही.' असं तिनेच मान्य केलं आहे.


हा व्हिडीओ २०२५ चा विचार करून बनवला आहे. त्याची सुरवात टी२० वर्ल्डकप फायनल श्रीनगरच्या क्रिकेट स्टेडियममध्ये दाखवली आहे. त्यानंतर क्रिकेट कॉमेंटेटर पाकिस्तान आणि इंग्लंडच्या दरम्यान होणाऱ्या सामन्याबद्ल सांगतो. मगं तो पाकिस्तानच्या दोन ओपनर्स बद्दल बोलतो  'दोन महान बॅट्समन बाबर अझम आणि विराट कोहली.'


त्यानंतर दुसरा सीन- तो एका घरातला आहे, जिथे सगळे पाकिस्तानी क्रिकेट फॅन्स मॅच बघत असतात. मगं एक मुलगी तिच्या वडीलांना सांगते, देखना आज तो विराट ही मॅच जिताएगा (तुम्ही फक्त बघा, आज विराटच मॅच जिंकवेल )


त्यावर तिचे वडील तिला उत्तर दितात," विराट कोहलीना पेहले इंडियाकी टीम में खेलता था, त्यावर मुलांनी आश्चर्याने प्रश्न विचारलाय "कोण इंडिया?"


या व्हिडीओला भारतीयांकडून चांगलंच उत्तर दिलं जात आहे, एकाने म्हटले आहे, "हे सोने आहे, तुम्हाला हे कुठे सापडलं? भारत हा पाकिस्तान आहे आणि भारतीयांचे काय? त्यांचा मुलगा भूगोलाच्या बाबतीत अज्ञानी का आहे, जर हे भविष्य आहे, तर ते ३० वर्ष जुन्या टीव्हीवर मॅच का पाहत आहेत, हे मला सांगा. कृपया मला मदत करा."