न्यूयॉर्क : अमेरिकेतल्या व्हर्जिनिया बीचमध्ये माथेफिरु व्यक्तीने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १२ जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झालेत. व्हर्जिनियातील म्युनसिपल सेंटरमध्ये हा गोळीबार झाला. इथल्या कर्मचाऱ्याने गोळीबार करताच पोलिसांनीही उत्तरादाखल गोळीबार केला. त्यात तो मारला गेला आहे. सिटी ऑफ व्हर्जिनिया बीच येथील महापालिकेच्या इमारतीत ही हल्ल्याची घटना घडली आहे. हल्लेखोराने नगरपालिकेमध्ये प्रवेश करून गोळीबार केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये एका माथेफिरूने गोळीबार केला. त्यावेळी एकच गोंधळ झाला. दहशतवादी हल्ला झाला काय, अशी शंका उपस्थितांमध्ये होती. मात्र, गोळीबार करणारा माथेफिरु होता. त्याच्या हल्लायत १२ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या प्रतिकारात हल्लेखोराचा देखील मृत्यू झाला आहे.  हल्लेखोर व्हर्जिनियामध्येच नोकरी करत असल्याची माहिती मिळत आहे. 



 माथेफिरुने केलेल्या गोळीबारीत  निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. दरम्यान, अशा घटना वारंवार घडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. हल्ले करणाऱ्यांमध्ये अगदी अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. अमेरिकेत सहजपणे मिळणाऱ्या अत्याधुनिक शस्त्रांनी अनेकांचा बळी गेले आहेत. अमेरिकेत अगदी किरकोळ कारणावरुनही गोळीबाराच्या घटनांत वाढ होताना दिसत आहेत.