दुसरा तिसरा कोण नाही तर झेलेन्स्कीच्या प्रेमात पडलीये पुतिन यांची मुलगी!
हे दोघेही गेल्या 5 वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चा आहेत.
रशिया : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही संपलेलं नाही. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मुलगी कॅटरिना तिखोनोवा हिचं झेलेन्स्कीसोबत अफेअर असल्याची बातमी समोर आली आहे. हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की नसून दुसरी व्यक्ती आहे.
पुतिन यांची मुलगी कॅटरिना तसंच झेलेन्स्की हे दोघं 50 हून अधिकवेळा एकमेकांना भेटले आहेत. एका अहवालाच्या माहितीनुसार, हे दोघेही गेल्या 5 वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चा आहेत.
एका मुलाची आई आहे कॅटरिना
डेलीमेलच्या बातमीनुसार, कॅटरिनाला इगोर झेलेन्स्की नावाचा मुलगाही आहे. कॅटरिनाचा नवरा झेलेन्स्की एक व्यावसायिक बॅले डान्सर आणि दिग्दर्शक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅटरिना ही पुतिन यांची धाकटी मुलगी आहे. पुतिन आणि ल्युडमिला यांचे 1983 मध्ये लग्न झालं. पण काही कारणास्तव त्यांना 2013 मध्ये घटस्फोट घ्यावा लागला.
कॅटरिनाचे लग्न किरिल शमालोव्हशी झालं होतं. शमालोव्ह यांची रशियातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून गणना केली जाते. 2017 मध्ये दोघांमधील अंतर वाढलं, त्यानंतर कतरिना एका बॅले डान्सरसोबत रिलेशनशिपमध्ये आली.
बॅले डान्सर झेलेन्स्कीच्या माजी पत्नीचे नाव याना सेरेब्र्याकोवा आहे. तो कोरिओग्राफर असून त्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे.