रशिया : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन रशिया-युक्रेन युद्धानंतर अधिक चर्चेत आले. ते पुन्हा बाबा होणार असल्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. पुतीन यांची कथित गर्लफ्रेंड आणि माजी जिमनास्ट अलीना काबेवा प्रेग्नंट असल्याची माहिती मिळाली आहे. पुतीन पुन्हा एकदा बाबा होणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन ऑक्टोबर महिन्यात 70 वर्षांचे होतील. ह्या चर्चा रंगल्या असतानाच जेव्हा पुतीन यांच्या कानावर ही बातमी गेली तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला. अहवालानुसार सध्या पुतीन विक्ट्री परेडच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत. 


अलीना काबेवाच्या प्रेग्नंसीबाबत जेव्हा त्यांना समजलं तेव्हा पुतीन खूप संतापले. पुतीन या कोणत्याही गोष्टीसाठी तयार नव्हते त्यामुळे राग आल्याचं समजलं आहे. 


व्लादिमीर पुतिन जिमनॅस्ट अलीना काबेवाला डेट करत आहेत. जिमनॅस्ट अलीनाने ओलिंपिकमध्ये 14 गोल्ड मेडल मिळवले आहेत. तर युरोपीय चॅम्पियनशीपमध्ये 25 मेडल जिंकली आहेत. 


पुतीन-अलीना यांना आधीच दोन मुलं आहेत. अलीनाने 2015 मध्ये पहिल्या मुलाला आणि त्यानंतर 2019 मध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. आता अलीना प्रेग्नंट असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. तर पुतीन यांनी देखील यावर कोणतंही भाष्य केलं नाही. झी 24 तासने या वृत्ताची कोणतीही पुष्टी केली नाही. ही सोशल मीडियावर फक्त चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.