Voyager 1 News:  अमेरिकन स्पेस एजन्सी अर्थात नासाने अंतराळात पाठवलेला पहिला उपग्रह 47 वर्षांनी पुन्हा सक्रिय झाला आहे. मानवाने अंतराळात पाठवलेला हा पहिला उपग्रह आहे. विविध ग्रहांचे निरीक्षण करण्यासाठी हा उपग्रह लाँच करण्यात आला होता. मधल्या काळात हा उपग्रहाचा संपर्क तुटला होता. मात्र, हा उपग्रह पुन्हा कार्यन्वित झाला आहे. यामुळे अनेक रहस्य उलगडणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतराळात भ्रमण करत असलेले व्हॉयेजर-1 Spacecraft  हे नासाचे वैज्ञानिक मागील 47 वर्षांपासून पृथ्वीवरु ऑपरेट करत आहेत. नासाच्या वेबसाइटनुसार व्हॉयेजर- 1 हा Spacecraft पृथ्वीपासून 24 अब्ज किलोमीटर अंतरावर आहे.  हा Spacecraft हळूहळू सौरमालेपासून दूर जात आहे. हे अंतर प्रकाशाच्या वेगाने पार करण्यासाठी रेडिओ सिग्नल मिळण्यासाठी 22.5 तास लागतात. याचा अर्थ Voyager 1 वर कमांड पाठवण्यास आणि प्रतिसाद प्राप्त करण्यास सुमारे दोन दिवस लागतात. व्हॉयेजर 1 ताशी 61,100 किलोमीटर वेगाने अंतराळात भ्रमण करत आहे. या Spacecraft ची लोकेशन सातत्याने बदलत आहे. या दरम्यान, Voyager 1 उपग्रह संपर्काबाहेर गेला होता. अखेर हा उपग्रह पुन्हा सक्रिय झाला आहे. 24 ऑक्टोबर रोजी या उपग्रहासोबत संपर्क झाला. 


यापूर्वी देखील व्हॉयेजर- 1 हा Spacecraft संपर्काबाहेर गेला होता. तब्बल पाच महिने  या Spacecraft शी कोणातही संपर्क होत नव्हता. अखेर पाच महिन्यानंतर या अंतराळात गायब झालेल्या स्पेसक्राफ्टशी संपर्क झाला. Spacecraft ने रहस्यमयी मसेज पाठवले होते. मात्र, या मसेजचा अर्थ कळत नव्हता. अखरे हा रस्हमयी मेसेज डिकोड करण्यात संशोधकांना यश आले होते. 


यापूर्वी देखील अमेरिकन स्पेस एजन्सी  व्हॉयेजर- 1 Spacecraft हा  पृथ्वीपासून 19 अब्ज KM अंतरावर असताना संपर्काबाहेर गेला होता. अचानक Spacecraft नासाच्या रडावरुन गायब झाला होता. अंतराळातून या Spacecraft चे आवाज येत होते.  या  आवाजाच्या दिशेनं NASA याचा शोध घेत होते.  आहे. या Spacecraft मार्फत मेसेज रहस्यमयी मेसेज पाठवले जात होते. तसेच Spacecraft मधून आवाज देखील येत होते.  हा  Spacecraft एलियन्सना सापडले असून हे आवाज एलियन्सकडून मिळणारे संदेश असल्याचा दावा केला जात. मात्र, अखेर या मेसेजचा उलगडा झाला आहे. 


नोव्हेंबर 2024 मध्ये व्हॉयेजर- 1 ने विचित्र मेसेज पाठवले होते. 14 नोव्हेंबर 2023 रोजी शेवटचा मेसेज आला होता. व्हॉयेजर- 1 च्या ऑनबोर्ड संगणक प्रणालींपैकी एकामध्ये बिघाड आढळून आला. हे संगणक व्हॉयेजर्स फ्लाइट डेटा सबसिस्टम (FDS) चा भाग आहेत. दक्षिण कॅलिफोर्नियातील नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेतील टीमला यात त्रुटी आढळल्या.  डेटा गोळा करणारी मेमरी चिप करप्ट झाली. या चिपमध्ये एफडीएस संगणकाचा सॉफ्टवेअर कोडही होता. अखेर अभियंत्यांच्या टीमने कोडला अनेक भागांमध्ये विभागले आणि फ्लाइट डेटा सबसिस्टममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले.  18 एप्रिल रोजी, व्हॉयेजर 1 ने पृथ्वीवर रेडिओ सिग्नल पाठवला. 20 एप्रिल रोजी नासाच्या ग्राउंड टीमला हा नवा मेसेज मिळाला.