आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात पुन्हा युद्ध सुरु
आर्मेनिया आणि अझरबैजान दरम्यान युद्ध संपवण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत.
नवी दिल्ली : आर्मेनिया आणि अझरबैजान दरम्यान युद्ध संपवण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. अमेरिकेच्या पुढाकाराने युद्धबंदीनंतर काही तासांनंतर दोन्ही देश पुन्हा समोरासमोर आले आहेत. युद्धविराम घोषित झाल्यानंतरही पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले.
सोमवारी, आर्मेनिया आणि अझरबैजान यांनी एकमेकांवर आरोप करत गोळीबार केला. नागोर्नो-काराबाख (Nagorno-Karabakh) प्रदेश ताब्यात घेतल्याबद्दल 27 सप्टेंबरपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरु आहे. आतापर्यंत या युद्धात पाच हजाराहून अधिक लोक ठार झाले आहेत. हा रशियाने जाहीर केलेला हा आकडा आहे, वास्तविक संख्या यापेक्षा अधिक असू शकते.
10 ऑक्टोबरपासून तीन वेळा युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे, परंतु काही तासांच्या संमतीनंतर एकमेकांवर दोन्ही देशांनी आक्रमण करण्यास सुरवात केली. वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी रविवारी आर्मेनिया आणि अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी स्वतंत्रपणे भेट घेतली. यानंतर युद्धबंदी जाहीर करण्यात आली.
या घोषणेनंतर थोड्या वेळाने अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आणि असा आरोप केला की आर्मिनियाच्या सैन्याने त्यांना लक्ष्य केले. त्यास उत्तर म्हणून आर्मेनियाकडून असे सांगितले गेले होते की, अझरबैजानच्या सैन्याने युद्धबंदी व क्षेपणास्त्रांचे उल्लंघन केले आहे.
अझरबैजानचे इल्हाम अलीयेव (Ilham Aliyev) म्हणाले की, राजकीय आणि लष्करी मार्गाने हा संघर्ष सोडवायचा आहे, पण त्यासाठी आर्मिनियाच्या सैन्याने सर्वप्रथम युद्ध थांबवावे आणि वादग्रस्त प्रदेशातून माघार घ्यावी. यापूर्वी, आर्मेनियाचे पंतप्रधान निकोलस पशिनियन (Nikol Pashinyan)यांनी आपल्या फेसबुक पेजवर लिहिले होते की आर्मेनियाने युद्धबंदीचं पालन केलं आहे.
पूर्व सोव्हिएत युनियनचा भाग असलेले आर्मेनिया आणि अझरबैजान दरम्यानच्या युद्धाचे प्रमुख कारण म्हणजे नागोर्नो-काराबाख (Nagorno-Karabakh) भाग आहे. अझरबैजान हा भाग आपलं असल्याचं सांगतो. ज्यावर सध्या आर्मेनियाचा ताबा आहे.