नवी दिल्ली: असं म्हणतात की प्री वेडिंग शूटमध्ये तरुणी फक्त फोटोग्राफरचं ऐकतात. मात्र इथे तर उलटच झालं राव. फोटोग्राफर पोज सांगायला गेला आणि त्याला तेच सांगणं महागात पडलं. त्यानंतर बहुदा हा फोटोग्राफर पोझ सांगण्याचं धाडस करेल असं वाटत नाही. याचं कारण म्हणजे या तरुणीनं चांगलीच अद्दल घडवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्न आणि त्याआधी आणि नंतर करण्या येणारे विधी ते क्षण सर्वांसाठी लाख मोलाचे असतात. आयुष्यात लग्न एकदाच होतं त्यामुळे हे खास क्षण जपून ठेवावेत म्हणून कॅमेऱ्यात अगदी छोटे छोटे क्षण कॅप्चर केले जातात. अगदी प्री वेडिंगपासून ते पोस्टवेडिंग पर्यंत अनेक क्षण टिपले जातात. काहीवेळा या फोटोग्राफरकडून चुकीचे कधी लज्जास्पद किंवा कधीतरी मजेशीर क्षणही कॅप्चर होतात. 


एका वेडिंग फोटोशूट दरम्यान चक्क होणाऱ्या पत्नीनंच फोटोग्राफरची चांगली जीरवली आहे. हा फोटोग्राफर कपलला पोज वेगवेगळ्या सांगत होता. त्यामध्ये एक पोज ही स्वीमिंग पूलजवळ होती. ही पोज कशी द्यायची हे सांगत असताना पत्नीनं नवऱ्यासह फोटोग्राफरलाही पाण्यात ढकलून दिलं. या मजेशीर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by hepgul5 (@hepgul5)


काही युझर्सनी या तरुणीला फोटोग्राफरची पोज आवडली नसेल म्हणून असा प्रकार केल्याची चर्चा सोशल मीडियावर केली आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप लाईक्स मिळत आहेत. तर पत्नीने केलेली ही मजा त्याला कदाचित पसंत आली नसावी कारण तो तयार असताना त्याला पाण्यात ढकलून दिल्यानं त्याला आवडलं नाही असंही या व्हिडीओमध्ये दिसत आहे.