नववधूकडून एक भयंकर मोठी चूक...ज्यामुळे नवरदेव पोहोचला रुग्णालयात, पाहा फोटो
नववधूकडून घोडचूक, नवरा आयुष्यातून उठता उठता वाचला
ब्रिटन: लग्नाच्या मंडपात अनेक गमती-जमती खेळ होत असतात. नवरदेव आणि नववधूसोबत अनेक खेळ मंडपात खेळण्याची देखील परंपरा आहे. मित्र परिवार-नातेवाईक यांच्यासोबत हे खेळ खेळले जातात. लग्नाच्या मंडपात असे खेळ किंवा गमती करता त्या मस्करीची कुस्करी देखील होते. त्यातून वाद होतात. लग्न मोडण्यापर्यंत देखील घटना काहीवेळा टोकाचे निर्णय होतात. लग्नाच्या मंडपात गमती-जमतीच्या मूडमध्ये असाल तर काहीशी काळजी घेणं गरजेचं असतं.
नववधूच्या एका भयंकर चुकीमुळे नवरदेवाला थेट रुग्णालयात जाण्याची वेळ आली आहे. डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार राउंडर्स नावाच्या खेळ मंडपात खेळण्यात येत होता. हा खेळ साधारण क्रिकेटसारखाच असतो. यावेळी नवरदेव आणि नववधू दोघंही मजा-मस्ती करत खेळत होते. नवरदेवाला याची पुसटशी कल्पनाही नव्हती की पुढे हाच खेळ आपल्या जीवावर बेतू शकतो.
हा खेळ रंगात आला असतानाच अचानक एक मोठी दुर्घटना घडली. राउडंर्स गेम दरम्यान नववधूने असा बॉल मारला की जो थेट नवरदेवाच्या प्रायवेट पार्टला जोरात लागला. या दुर्घटनेनंतर नवरदेव खाली कोसळला. त्याची प्रकृती बिघडली त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.
नवरदेवाला जास्त गंभीर दुखापत नसल्याने उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ही घटना गेल्या महिन्यात 25 सप्टेंबरची आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. घटनेच्या वेळी वधूची बहीण मोबाईल कॅमेऱ्यात व्हिडिओ रेकॉर्ड करत होती. जो काही वेळानंतर टिकटॉकवर शेअर करण्यात आला. व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी शेअर करायला सुरुवात केली.