Weird Rituals : जगभरात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. जेवढ्या जाती, जमात तेवढ्यात परंपरा आणि रीतिरीवाज असतात. आजही काही समाजात अजब आणि विचित्र प्रथा (Weird Rituals) पाळल्या जात आहेत. जगभरातील अनोख्या परंपरांबद्दल आमच्या लेखातून तुम्हाला सांगत असतो. आज आदिवासी जमाचीची (Tribe Rituals) विचित्र परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत. त्या जमातीत कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर महिलेचं अर्ध बोट छाटलं जातं. एवढंच नाही तर या जमातीतील महिलो असो किंवा पुरुष कंबरेच्या वरती कपडे घालत नाहीत. (Weird Rituals In this tribe women men dont wear clothes above the waist and after the death of a family member half a finger of a woman is cut off Viral News) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर या परंपरेत महिलांनाच आजही वेदनादायी शिक्षा दिली जाते. कुठे आहे ही परंपरा आणि काय आहे यामागील कारणं काय जाणून घेऊयात. 


कुठे आहे ही परंपरा?


ही परंपरा इंडोनेशियातील (Indonesian Dani tribe) एका जमातीत आजही पाळली जात आहे. या जमातीचं नाव दानी असं आहे. अनोख्या पंरपरेमुळे ही जमात जगभरात ओळखली जाते. त्याचं राहिणीमान असो किंवा प्रथा परंपरा असो, कायम चर्चेत असते. या जमातीतील स्त्री पुरुषांची ड्रेसिंग अगदी अनोखी असून पापुआ न्यू गिनीचा एक प्रतिनिधी त्याच पोशाखात संयुक्त राष्ट्रात आला होता. त्यावेळी ही जमात सोशल मीडियापासून सगळीकडे चर्चेली गेली होती. 


महिलांना का दिली जाते वेदनादायी शिक्षा?


डेलीमेलच्या रिपोर्टनुसार , जेव्हा या जमातीत कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू होतो, तेव्हा या कुटुंबातील महिलांना अत्यंत क्लेशदायक अशी शिक्षा दिली जाते. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर या कुटुंबातील महिलांचं एक बोट अर्ध कापलं जातं. होय, व्यक्तीच्या मृत्यूनंतर महिलांच्या बोटाचा वरचा भाग कापण्यात येतो. यामुळे या जमातीतील अनेक महिलांची बोटं अर्धवट दिसतात. 


हेसुद्धा वाचा - परंपरेच्या नावाखाली इथे मुलं म्हाताऱ्या आई-वडिलांना मारतात! ही विचित्र प्रथेमागील कारण जाणून बसेल धक्का



रिपोर्ट्सनुसार, हा विधी करण्यापूर्वी महिलांच्या बोटाला दोरीने बांधलं जातं जेणेकरून त्यात रक्ताभिसरण होता कामा नाही. नंतर कुऱ्हाडीच्या साहाय्याने ते बोट अर्ध छाटलं जातं. ते छाटलेले बोट एकतर जाळलं जातं किंवा कुठेतरी ठेवलं जातं. कुऱ्हाडीने बोट कापणे खूप वेदनादायक असून आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती ही परंपरा आजही पाळली जाते. आता सरकारने दखल घेतल्यामुळे ही परंपरा काही प्रमाणात कमी झाल्याचं बोलं जातं आहे. 


कपड्यावरुन का असतात चर्चेत?


या जमातीचे कपडे कायम चर्चेत असतात. या जमातीतील स्त्री आणि पुरुष दोघेही कमरेच्या वरती काही कपडे घालत नाहीत. याचा अर्थ महिला या अर्धनग्न अवस्थेत आवारतात. या जमातीत महिलांचं कपडे न घालणे सामान्य गोष्ट आहे. त्याच वेळी, पुरुष कंबरेच्या खाली 'कोटेका' नावाचं वस्त्र परिधान करत असतात. ज्यामुळे त्यांचं लिंग झाकलं जातं. याशिवाय पुरुष आपल्या शरीरावर दुसरं काहीही परिधान करत नाही. तर महिला हाताने बनवलेले स्कर्ट कमरेच्या खाली परिधान केले जातात.