Weird Tradition: लोक त्यांच्या मृत्यूसाठी खरेदी करतायत त्यांच्या आवडत्या कबरी, कपडे आणि शवपेटी
लोक जिवंतपणीचं त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी (funeral) वस्तू खरेदी करत आहे... होय, असा एक देश आहे जिथे लोक मृत्यू येण्यापूर्वीच कबर, कपडे आणि कफन खरेदी करतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की...
Shukatsu Festival For Death Funeral: जेव्हा कोणी मृत्यू पावतात तेव्हा त्याच्या अंत्यसंस्कारासाठी वस्तू खरेदी केल्या जातात. परंतु तुम्ही कधी ऐकले ही नसेल, लोक जिवंतपणीचं त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी (funeral) वस्तू खरेदी करत आहे... होय, असा एक देश आहे जिथे लोक मृत्यू येण्यापूर्वीच कबर, कपडे आणि कफन खरेदी करतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की यासाठी एक महोत्सव देखील आयोजित केला जातो. जो शुकात्सू उत्सव (Shukatsu Festival) म्हणून ओळखला जातो.
जपान असा देश आहे जिथे जिवंत लोक त्यांच्या मृत्यूसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू आधीच खरेदी करतात. राजधानी टोकियोमध्ये (Tokyo) अंत्यसंस्कार व्यवसाय मेळा आयोजित केला जातो आणि लोक येथे खरेदी करण्यासाठी जात असतात. दरवर्षी 16 डिसेंबर रोजी 'शुकात्सु उत्सव' (Shukatsu Festival) हा उत्सवाचा दिवस म्हणून साजरा केला जातो.
या सणाला 'शुकात्सु फेस्ता' (Shukatsu Festa) असेही म्हणतात. या उत्सवामध्ये लोक त्यांच्या अंत्यसंस्काराचा पोशाख निवडतात, फुलांनी भरलेल्या शवपेटीची (Coffin) स्लिप कापतात आणि त्यामध्ये पडून चित्रासाठी पोज देखील देतात. एवढेच नाही तर लोक स्मशानभूमीत (cemetery) प्लॉट खरेदी करतात.
मृत्यू हा असा विषय आहे ज्याचा लोक फारसा विचार करत नाहीत. खरं तर, मृत्यूचा उत्सव (celebration of death) साजरा करणे ही कदाचित सर्वात चुकीची कल्पना आहे. टोकियोच्या शुकात्सू महोत्सवात लोकांना मृत्यूसाठी योग्य प्रकारे तयारी कशी करावी हे शिकवले जाते. जपानी भाषेत 'शुकात्सु' (Shukatsu) म्हणजे एखाद्याच्या शेवटाची तयारी करणे.
या व्यवसायाला 'एडिंग इंडस्ट्री' (Ending Industry) म्हणतात. मृत्यूनंतर काय होते आणि ते गेल्यानंतर उरलेल्यांचे काय होईल याची लोकांना जाणीव करून देणे हा त्याचा मुख्य उद्देश असतो. मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीचे शरीर कसे तयार करावे हे देखील अभ्यागतांना शिकवले जाते.
जपानमध्ये जगातील सर्वात जुनी लोकसंख्या तर आहेच, पण अंत्यसंस्काराचा सर्वात मोठा उद्योगही आहे. पण याचा अर्थ असा नाही की हा सण केवळ ज्येष्ठांच्या हिताचा आहे. अशीच आवड दाखवणाऱ्या तरुणांची संख्याही मोठी आहे.