स्कॉटलंड : विमान प्रवास हा सर्वात वेगवान आणि ऐशोआरामाचा समजला जातो. कमी वेळेत आणि आरामात प्रवास करता यावा याकरिता विमानसेवेला अनेकजण प्राधान्य देतात. पण स्कॉटलंडमध्ये प्रवासी जागेवर स्थिरावण्याच्या आतमध्येच ते इच्छित स्थळी पोहचलेले असतात.
    स्कॉटलंडमधील वेस्टरे ते पापा वेस्टरे या दोन बेटांना जोडणारी ही विमानसेवा खास आकर्षण  ठरत आहे. केवळ अडीच किलोमीटरच्या पल्ल्यासाठी लोगन एअरनं ही विमानसेवा सुरू केली आहे. हा प्रवास केवळ ५३ सेकंदाचा आहे. कधी  वाऱ्याची दिशा बदलली तर मात्र  ५३ सेकंदाचा हा प्रवास २ मिनिटांचा होतो.
वेस्टरे ते पापा वेस्टरे जगातील सर्वात लहान विमान प्रवास म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत जवळपास १० लाख लोकांनी या विमानमार्गाने प्रवास केला आहे. या विमानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना सुमारे दीड हजार रुपये मोजावे लागतात. १९६७ मध्ये ही सेवा सुरु करण्यात आली ती आजतागायत सुरु आहे. आठवड्यातून सहा दिवस ही विमानसेवा सुरू असते. पापा वेस्टरे या स्कॉटलंडमधील ऐतिहासिक स्थळाला अनेक विद्यार्थी आणि शिक्षक भेट देण्यासाठी विमानसेवेचा पर्याय निवडतात.