घडाळ्याच्या खाली लिहिलेल्या Quartz चा नक्की अर्थ काय?
घडाळ्याच्या खाली Quartz असं का लिहिलेलं असतं?
मुंबई : आपण लहानपणापासूनच प्रत्येक ठिकाणी घड्याळ पाहतो. अनेक जण हातात घड्याळही बांधतात. तुम्ही जेव्हा जेव्हा घड्याळं पाहिली असेल, तेव्हा तुम्ही घड्याळावर लिहिलेला एक इंग्रजी शब्द नक्कीच पाहिला असेल. वास्तविक हा शब्द बर्याच घड्याळांवर लिहिलेला आहे आणि तो शब्द क्वार्ट्ज (Quartz) आहे. पण हे कंपनीचे नाव नाहीये. मग त्यानंतरही ते नाव घडाळ्यावर लिहिलेलं असतं. हे नाव असण्यामागे एक कारण आहे. प्रत्येक जण वेळ पाहतो आणि आपल्या कामाला लागतो. पण या शब्दाबद्दल आपण जाणून घेत नाहीत किंवा आपल्याला त्याबद्दल माहिती नसते. या शब्दामागे असणार गुपित आपण जाणून घेणार आहोत. (What exactly does the quartz written below the clock mean)
काय आहे Quartz?
Quartz हे टायमिंग टेक्नोलॉजीचे नाव आहे. या टेक्नोलॉजीचा वापर ज्या घडाळ्यात केला जातो, त्या घड्याळांमध्ये Quartz असं लिहिलं जातं. Quartz हे एकाप्रकारे क्रिस्टल आहे. हे एका सेंकदात 32 हजार 768 वेळा कंपण पावतं. कंपण पावल्याने घडाळ्याच्या मशीनला सिग्नल जातो. या सिग्नलमुळे सेकंद काटा हालचाल करतो.
Quartz च्या कंपणामुळे घडाळ्यातील काटा हलतो. त्यामुळे आपल्याला योग्य वेळ समजते.
या कंपणामुळे सेंकद काटा हलतो. त्या आधारावर मिनिट आणि तास काटा कार्य करतो. हा कंपण टायमर पर्यंत पोहोचतो. जिथून काट्याला पुढे सरकण्याचे आदेश प्राप्त होतात. त्यामुळे सातत्याने घडाळ्यातील काटे हलते राहतात.
या तंत्रज्ञानाचा वापर आजच्या घडाळ्यांमध्ये सर्वाधिक केला जातो. जेव्हा करंट पोहचतो, तेव्हा कंप पावण्यास सुरुवात होते. ही प्रणाली काऊंटर घड्याळातच असते.
अधिक वाचा :
Lost Passport | परदेशी फिरायला गेल्यावर पासपोर्ट हरवरल्यास काय करायचं?