Lost Passport | परदेशी फिरायला गेल्यावर पासपोर्ट हरवरल्यास काय करायचं?

 परदेशात जाण्यासाठी (International Tour)  पासपोर्ट (Passport) असणं बंधनकारक असतं. 

Updated: Jun 25, 2021, 04:50 PM IST
Lost Passport | परदेशी फिरायला गेल्यावर पासपोर्ट हरवरल्यास काय करायचं? title=

मुंबई : परदेशात जाण्यासाठी (International Tour) सर्वात आधी पासपोर्ट (Passport) आणि व्हीजा (Visa) आवश्यक आणि बंधनकारक असतो. परदेशात जाताना विमानतळावर (Airport) पासपोर्ट तपासला जातो. त्यानंतर इच्छित ठिकाणी फ्लाईट उतरल्यानंतर पासपोर्टवर स्टँप मारला जातो. त्यानंतर जेव्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात होते तेव्हा अशीच प्रक्रिया केली जाते.  त्या स्टँपवरुन संबंधित व्यक्तीने देश सोडल्याचं सूचित होतं. (What to do if you lose your passport while traveling abroad know full details)

परदेशात पासपोर्ट सर्वात महत्वाचा कागदपत्र आहे. परदेशात प्रवासादरम्यान किंवा फिरताना जर तुम्ही (Lost Passport) पासपोर्ट विसरलात, तर अनेक अडचणींना सामना करावा लागतो. अशा वेळी तारांबळ उडते. अशा वेळेस नेमकं काय करायचं, याबाबत माहिती नसतं. त्यामुळे असा बाका प्रसंग उद्भवल्यास ,काय करायचंय हे आपण जाणून घेणार आहोत.

पासपोर्ट हरवल्यास काय करायचं?

चूक माणसाकडूनच होते. पर्यटनासाठी तसेच कामानिमित्ताने आपण परदेशात जातो. आपल्यासाठी ते ठिकाणं नवं आणि अनोळखी असतं. तेथील भाषा, लोकं सर्वकाही आपल्यासाठी  प्रतिकूल असतं. अशावेळेस गडबडीत आपण पासपोर्ट विसरुन जाते. काही वेळानंतर जेव्हा आपण पासपोर्ट तपासतो, तेव्हा ते हरवल्याचं आपल्या लक्षात येतं. अशावेळेस गोंधळून न जाता स्थानिक पोलिसांकडे (Police) याबाबतची तक्रार नोंदवावी. 

प्रत्येक देशात भारतीय दूतावास (Embassy of India) असतं. परदेशात आलेल्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी दूतावास असतं. पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर दूतावासात संपर्क साधायचा असतो. दूतावासात घडलेली सर्व हकीकत सांगावी लागते. तसेच वैयक्तिक माहिती द्यावी लागते. 

त्यानंतर तुम्ही दुसऱ्या पासपोर्टसाठी अर्ज करु शकता. परदेशातून भारतात येण्यासाठी काही दिवस असतील, तर दूतावास रिप्लेसमेंट पासपोर्ट तयार करते. हा रिप्लेसमेंट पासपोर्ट भारतात तयार केला जातो. त्यानंतर तो पासपोर्ट संबंधित देशातील भारतीय दूतावासात पाठवला जातो. या सर्व प्रक्रियेसाठी काही दिवसांचा कालावधी लागतो.

तातडीने परतायचं असेल तर काय?  

तुम्हाला भारतात येण्यासाठी महिन्याभराचा अवधी असेल, तर दूतावास सर्व औपचारिकता पूर्ण करुन नवा पासपोर्ट तयार करते. पण काही वेळा 2-3 दिवसात परतायचं असेल अन पासपोर्ट नसेल, तर काय होतं, हे ही आपण जाणून घेऊयात. अशा वेळेस दूतावासाकडून एक प्रमाणपत्र देण्यात येतं. या प्रमाणपत्राच्या मदतीने भारतात परतता येतं. विशेष म्हणजे जर तुमच्याकडे विमान तिकीटासाठी पैसे नसतील, तर दूतावासाकडून त्या व्यक्तीची भारतात पोहचण्याची सर्व सोय केली जाते.  

संबंधित बातम्या : 

चीनची चालाकी पुन्हा एकदा उघड; कोरोनाचा गायब केलेला डेटा अमेरिकेनं शोधला

जगातले सर्वात मोठे दानशूर ठरले 'टाटा', भारतीय दानशुरांचा जगात बोलबाला