What if All Humans Die: पृथ्वीचा विनाश हा अटळ आहे. पृथ्वीच्या विनाशा आधी जीवसृष्टीचा अंत होणार आहे.  हळू हळू पृथ्वीवरुन एक एक सजीव नाहीसे होणार आहेत.  पृथ्वीवरुन मानव नष्ट झाल्यावर जगावर कोण राज्य करेल? असा प्रश्न उपस्थित होतो. संशोधकांनी या प्रश्नाचे संभाव्य उत्तर शोधले आहे. याचे उत्तर अतिशय धक्कादायक आहे. जाणून घेऊया संशोधकांनी काय अंदाज वर्तवले आहेत. 


हे देखील वाचा.... पृथ्वीवरील अदृष्य नदीचे पुरावे पाहून संशोधक अचंबित! 5500 वर्षापूर्वीचा रहस्यमयी इतिहास आणि भारतातील 5 राज्यांशी थेट कनेक्शन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डायनासोरप्रमाणेच एक दिवस मानवही या पृथ्वीवरून नाहीसे होणार आहेत.  मानवानंतर पृथ्वीवर कोणता सजीव वर्चस्व गाजवेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पृथ्वीवर कोणता प्राणी पृथ्वीवर अधिराज्य गाजवेल याचा खुलासा संशोधकांनी केला आहे. हा प्राणी म्हणजे एक सागरी जीव आहे. ऑक्टोपस असे या प्राण्याचे नाव आहे. जेव्हा या पृथ्वीवर मानवाचे अस्तित्व राहणार नाही, तेव्हा हा 8 पायांचा प्राणी पृथ्वीचा ताबा घेईल असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. 


हे देखील वाचा ... समुद्रापासून निर्माण झाला पृथ्वीवरील ग्रेट हिमालय पर्वत; 4.70 कोटी वर्षांंपूर्वी असं काय घडलं?


डेली मेलने याबाबतचे वृत्त दिले आहे. जगात एकीकडे युद्ध स्थिती आहे. तर, दुसरीकडे हवामान झपाट्याने बदलत आहे. मानव विनाशाच्या वाटेवर आहे. पृथ्वीवर लाखो प्राण्यांसह मानव नष्ट झाले तर कोणता जीव आपले अस्तित्तव टिकवून ठेवेल याबाबत प्राणीशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ संशोधन करत आहे. जेव्हा मानवाचा अंत होईल तेव्हा ऑक्टोपस आपले टिकवून ठेवेल असा दावा केला जात आहे. ऑक्टोपस यांच्याकडे शारीरिक आणि मानसिक गुण आहेत.


हे देखील वाचा.. GK Quiz : जगातील अनोखा जीव ज्याचा शारीरिक संबध ठेवल्यावर होतो मृत्यू


ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर टिम कुलसन यांनी याबाबत एक शक्यता वर्तवली आहे. समुद्रातील प्राणी जगावर वसाहत निर्माण करतील. अटलांटिससारखी पाण्याखालील वसाहत तयार करण्यासाठी त्यांच्या स्वत:च्या बनवलेल्या जटिल साधनांचा वापर करतील असे टिम कुलसन म्हणाले.


ऑक्टोपस हा खूप बुद्धीमान जीव आहे. त्यांच्यात बुद्धिमत्ता, कुतूहल आणि एकमेकांशी संवाद साधण्याची क्षमता आहे. यामुळेच पृथ्वीवरून मानव नष्ट झाला तर ऑक्टोपस मानवाची जागा घेऊ शकतात. ऑक्टोपस त्यांच्या विशेष क्षमतेने एक दिवस जगाचा ताबा घेतील असे  कौलसन यांनी द युरोपियन मॅगझिनला सांगितले आहे. याबाबत आणखी एक तर्क मांडण्यात आले आहे. जलचर प्राणी हे 30 मिनिटे पाण्याबाहेर राहू शकतात. पण, जलचर प्राण्यांनी अद्याप पाण्याबाहेर शिकार केलेली नाही.  त्यांना जमिनीवर शिकार करण्यात तज्ञ होण्यासाठी लाखो वर्षे लागतील. असे झाल्यास ऑक्टोपस सहज पृथ्वीवर ताबा मिळवू शकतात.