मुंबई : कोरोनाची महामारी सुरु झाल्यापासून सगळीकडेच वर्क फ्रॉम होम सुरु झालं आहे. परंतु त्यानंतर लोकांना 8 ते 9 तास नाही तर त्यापेक्षा जास्त वेळ काम करावं लागतं. त्यामुळे कर्मचाऱ्याला बॉस केव्हा ही फोन करतो, ज्यामुळे अनेकांना त्यांच्या कुटुंबाला वेळ द्यायला मिळत नाही. ज्यामुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. यासगळ्याचा विचार करता अनेक देशांनी यावर एक मार्ग काढला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरेतर बेल्जियम या देशात एक फेब्रुवारी 2022 पासून ‘राईट टु डिस्कनेक्ट’ (Right to Disconnect ) हा नियम लागू करण्यात आला आहे. ज्यामुळे शिफ्ट संपल्यानंतर कोणताही कर्मचारी आपल्या बॉसच्या कॉल किंवा मेसेजला उत्तर देण्यास बांधिल नसतील.


बेल्जियमच्या अगोदर अनेक देशात हा नियम लागू करण्यात आला आहे. परंतु हे लक्षात घ्या की भारतात अजून तरी असा कोणताही नियम लागू केलेला नाही.



राईट टू डिस्कनेक्ट नियमांतर्गत कोणताही बॉस त्याच्या कर्मचाऱ्यांना शिफ्ट संपल्यानंतर वारंवार कॉल, ईमेल किंवा मेसेज करून त्रास देऊ शकत नाही.


राईट टू डिस्कनेक्ट हा नियम भारतातील लोकांना ऐकण्यासाठी नवीन वाटत असला तरी, युरोपातील अनेक देशांमध्ये तो अगदी सामान्य आहे आणि फेब्रुवारीपासुन बेल्झियम देखील त्यांपैकी एक देश बनला आहे.


परंतु हा नियम डॉक्टर, सैन्य, पोलिस इत्यादी आपत्कालीन सेवांसाठी काम करणाऱ्या लोकांसाठी नाही.


हा नियम कोणत्या देशांमध्ये लागू आहे?


फ्रान्स, इटली, जर्मनी, स्वोवाकिया, फिलीपीन्स, कॅनडा, आणि आर्यलॅन्ड, आदी देशात हा नियम लागू झाला आहे.