नवी दिल्ली : चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत. आज शी जिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची महाबलीपुरममध्ये (Mahabalipuram) भेट होणार आहे. याच दरम्यान पाकिस्तान पुन्हा एक मोठं पाऊल उलचणार असल्याची गुप्त माहिती भारताच्या हाती लागलीय. आज नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग ज्या वेळी भेटणार आहेत त्याच वेळी पाकिस्तान एक मिसाईल परिक्षण करणार आहे. कराची पोर्टजवळ हे मिसाईल परिक्षण होणार असल्याचं समजतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुप्तचर यंत्रणेनं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान हे परिक्षण सोनमियानी परीक्षण रेंजमध्ये करणार आहे. पाकिस्तानचं दक्षिणी बंदर आणि शहर कराची इथून हा भाग जवळपास उत्तर-पश्चिम दिशेला ४० किलोमीटर अंतरावर आहे.



यापूर्वी गेल्या ऑगस्ट महिन्यात पाकिस्ताननं जमिनीवरून जमिनीवर हल्ला करू शकणाऱ्या बॅलेस्टिक मिसाईल - गजनवीचं यशस्वी परीक्षण केलं होतं. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) द्वारे याबद्दल माहिती दिली होती. ISPR चे महासंचालक मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली होती. ही मिसाईल २९० किलोमीटरपर्यंत अनेक प्रकारचे हत्यारं वाहून नेण्यासाठी सक्षम आहे. 


याअगोदर पाकिस्तानी सेना जमिनीवरून जमिनीवर हल्ला करू शकणाऱ्या बॅलेस्टिक मिसाईल - शाहीन २ चं परीक्षण करण्यात यशस्वी ठरली होती. मे महिन्यात हे परीक्षण पार पडलं होतं.