विमान उडवताना पायलटचा डोळा लागला; 46 किलोमीटरनंतर जाग आली आणि...!
विमान प्रवासादरम्यान अनेक वेळा असे अपघात घडतात जे आपल्याला हादरवून सोडतात.
मेलबर्न : विमानात प्रवास करण्याची इच्छा प्रत्येकाची असते, परंतु विमान प्रवासादरम्यान अनेक वेळा असे अपघात घडतात जे आपल्याला हादरवून सोडतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत. जे हजारो फूट उंचीवर उडणाऱ्या विमानात घडलं. तेही पायलटसोबत.
झालं असं की, विमान उडवत असलेल्या पायलटला गाढ झोप लागली आणि तो बराच वेळ झोपला, त्याने डोळे उघडले तोपर्यंत विमान 46 किमी पुढे गेले होते. ही घटना 2018 सालची आहे. ऑस्ट्रेलियामध्ये घडलेल्या या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.
विमान उडवत असताना, ते उडवत असलेला पायलट गाढ झोपेत होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे झोपेत असताना त्याने आपले विमान 46 किमी पुढे नेलं. या घटनेनंतर पायलटविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले होते. जरी ते मालवाहू विमान होतं. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला कोणताही धोका नव्हता.
या चुकीमुळे वैमानिकाचा जीव मात्र स्वतःला गमवावा लागला असता. विमान कंपनी 'वार्टेक्स एअर'ने या घटनेबाबत सांगितलं होतं की, विमानात फक्त पायलटच होता. पायलटने हे विमान टास्मानियामधील डेव्हनपोर्ट शहरातून बास स्ट्रेटमधील किंग आयलंडपर्यंत उडवलं होतं. या एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटलं आहे की, पायलटला टेक ऑफ करताना झोप लागली होती.
एअरलाइन्सने असंही म्हटलंय की, एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागाला याची माहिती येईपर्यंत विमानातील पायलटशी संपर्क साधता आला नाही. पायलटने विमान किंग बेटावर सुरक्षितपणे उतरवलं होतं. विमान कंपनीने मात्र वैमानिकाची ओळख सार्वजनिक केलेली नाही. विमान प्रवासादरम्यान पायलटला झोप लागल्याची ही पहिलीच घटना नाही.