मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे जगातले बहुतेक देश लॉकडाऊन करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरस कधी संपणार? हा एकच प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी एण्ड डिझाईन (SUTU)च्या संशोधकांनी केला आहे. यासाठी विद्यापीठाच्या संशोधकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कोरोनाचं विश्लेषण केल्यानंतर १३१ देशांमधला कोरोना कधी संपेल? याचं उत्तर मिळाल्याचा दावा सिंगापूर विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संशोधकांनी यासाठी ISR (infected suuceptible recovered) मॉडेलचा वापर केला. हे मॉडेल महामारीच्या जीवन चक्रापासून ते व्हायरसचा नाश होण्यापर्यंतचा अंदाज लावतं. जगभरातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा डेटा ऑवर वर्ल्ड इन या वेबसाईटच्या माध्यमातून घेण्यात आला. या गणितीय मॉडेलच्या आधारे विद्यापीठाने कोरोनाबाबात भविष्यवाणी केली आहे. 


सिंगापूर विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार २१ मेपर्यंत कोरोना ९७ टक्के आणि ८ डिसेंबरपर्यंत १०० टक्के नष्ट होईल, पण बहरीन आणि कतार यांच्यासारख्या काही देशांमध्ये कोरोनाचा नायनाट व्हायला फेब्रुवारी २०२१ उजाडेल. 


सिंगापूर विद्यापीठाच्या संशोधकांनी हा दावा केला असला तरी या अंदाजाचा कालावधी बदलण्याचा संभव असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर ऑवर वर्ल्ड इन या वेबसाईटवरचे आकडे रोज अपडेट केले जातात आणि याचं विश्लेषण आणि अनुमान फक्त शैक्षणिक आणि संशोधनाच्या उद्देशासाठी आहे, असं वेबसाईटचं म्हणणं आहे.


विद्यापीठाच्या दाव्यानुसार कधी संपणार कोरोना?


भारत- २१ मे 


अमेरिका- ऑगस्ट महिन्यातला शेवटचा आठवडा (११ मेपर्यंत ९७ टक्के)


इटली- ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा (७ मेपर्यंत जवळपास ९७ टक्के)


इराण- १० मे


तुर्कीस्तान- १५ मे


युके- ९ मे 


स्पेन- मेच्या सुरुवातीला 


फ्रान्स- ३ मे 


जर्मनी- ३० एप्रिल