मुंबई : सध्या जगात सर्वत्र  शांततेच्या प्रयत्नांबद्दल चर्चा होत असली, परंतु हे खरे आहे की, प्रत्येक देश स्वतःचे संरक्षण करण्यासाठी शस्त्रे गोळा करत राहतो. क्षेपणास्त्र, रॉकेट, लढाऊ विमाने आणि बरंच काही. परंतु जेव्हा धोकादायक शस्त्रास्त्रांचा प्रश्न येतो तेव्हा कदाचित अणुबॉम्बपेक्षा अधिक धोकादायक काहीही वाटत नाही. जगातील कोणते देश आहेत ज्यांच्याकडे या धोकादायक शस्त्रांचा साठा आहे ते आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.


चीनकडे सर्वाधिक शस्त्रे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील 10 वर्षांत चीन हा जगातील असा देश असेल ज्याकडे जास्त परमाणू हत्यारे (Nuclear power) बनवण्याची सर्वाधिक क्षमता असेल. चीन परमाणु बनवण्यामध्ये अमेरिकेलाही मागे टाकेल. जगातील वाढत्या परमाणुचा साठा रोखण्यासाठी 1968मध्ये नॉन-प्रॉलिफेरेशन ट्रीटी (NPT) लाँच करण्यात आली.


अमेरिका आणि इतर काही देशांनी या करारावर स्वाक्षरी केल्या आहे. याशिवाय 1996 मध्ये व्यापक अणुचाचणी बंदी करार (CTBT) करण्यात आला. भारत, इस्रायल आणि पाकिस्तानने कधीही एनपीटीवर स्वाक्षरी केलेली नाही आणि या देशांकडे अणुशस्त्रे आहेत.


अमेरिकेत अण्वस्त्रेंचा स्टॉक


अमेरिका हा जगातील पहिला देश आहे, ज्याने सर्वप्रथम अण्वस्त्रे बनवायला सुरुवात केली आणि त्यांचा वापर करणारा तो पहिला देश होता. 1940 ते 1996 पर्यंत अमेरिकन सरकारने अण्वस्त्रांवर 8.8 ट्रिलियन डॉलर खर्च केला. सध्या अमेरिकेकडे 5800 अण्वस्त्रे आहेत, त्यापैकी 1 हजार 750 अण्वस्त्रे सक्रिय आहेत आणि युनायटेड किंगडमकडे सध्या 195 अण्वस्त्रे आहेत.


रशियाकडे किती अण्वस्त्रे?


अमेरिकेनंतर अणुचाचणी घेणारा रशिया हा जगातील दुसरा देश होता. रशियाने पहिली आण्विक चाचणी 29 ऑगस्ट 1949 रोजी केली. दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या या प्रकल्पाला सोव्हिएत अणुबॉम्ब प्रकल्प असे नाव देण्यात आले. 24 ऑक्टोबर 1990 रोजी रशियाने शेवटची आण्विक चाचणी घेतली. रशियाकडे सध्या एकूण 6 हजार 372 अण्वस्त्रे आहेत, त्यापैकी 1 हजार 790 शस्त्रे सक्रिय आहेत.


चीनकडे किती शस्त्रे आहेत?


पुढील 10 वर्षांत अण्वस्त्र क्षमतेच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकण्यास सज्ज असलेल्या चीनकडे सध्या 320 अण्वस्त्रे आहेत परंतु सध्या त्यातील एकही सक्रिय नाही. चीनने 16 ऑक्टोबर 1964 रोजी पहिली अणु चाचणी केली. शेवटची चाचणी 29 जुलै 1996 रोजी झाली.


फ्रान्सकडे किती शस्त्रे आहेत?


जर आपण फ्रान्सबद्दल बोललो तर ते रशिया आणि अमेरिकेपेक्षा खूप मागे आहे असे दिसते. फ्रान्सने 13 फेब्रुवारी 1960 रोजी पहिली आण्विक चाचणी घेतली. शेवटची आण्विक चाचणी 27 जानेवारी 1996 रोजी झाली. सध्या, फ्रान्सकडे 300 अण्वस्त्रे आहेत, त्यापैकी 290 सक्रिय आहेत.


भारताकडे इतकी शस्त्रे आहेत


भारताने आपला आण्विक बनवण्यासाठी 1967 मध्ये सुरू केली आणि खऱ्या अर्थाने पहिली अणुचाचणी 1998 साली झाली. भारतात आतापर्यंत सुमारे सहा चाचण्या झाल्या आहेत. भारताकडे अण्वस्त्रांची संख्या सुमारे 150 आहे आणि भारत 400 ते 500 अण्वस्त्रे बनवू शकतो.


उत्तर कोरियाकडे सध्या 30 ते 40 अण्वस्त्रे आहेत. जर आपण इस्रायलबद्दल बोललो तर त्याच्याकडे 90 अण्वस्त्रे आहेत.


पाकिस्तान भारताच्या पुढे


मे 1998 मध्ये भारताच्या अणुचाचणीनंतर पाकिस्तानने पहिली अणुचाचणी घेतली. आज पाकिस्तानकडे 160 अण्वस्त्रे आहेत. पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत अनेकदा प्रश्न निर्माण होतात. असे मानले जाते की, पाकिस्तान चीनच्या माध्यमातून उत्तर कोरियाच्या आण्विक कार्यक्रमात मदत करतो.