वॉशिंग्टन : सॉकर खेळाडू कॉलिन केपरनिकला नायकीचा ब्रँड अँम्बेसिडर केल्याचा निषेधात अमेरीकन नागरिकांनी नायकीचे बूट आणि कपडे जाळलेत. २०१६ मध्ये केपरनिकनं राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा निषेध नोंदवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॉकर खेळाडू कॉलिन केपरनिकला नायकीचा ब्रँड अँम्बेसिडर केल्यानं अमेरिकन नागिरकांनी आपला संताप व्यक्त केलाय. त्यांनी नायकीचे शूज आणि कपडे जाळत आपला निषेध व्यक्त केलाय.असं काय केलं कॉलिन केपरनिकनं, पाहूयात हा रिपोर्ट. अमेरिकेत सध्या नायकीच्या शूजची होळी करण्यात आल्याचं चित्र सर्वत्र पहायाला मिळतंय. याला कारणही तसंच आहे. अमेरिकेचा सॉकर खेळाडू कॉलिन केपरनिकला नायकेचा ब्रँड अॅम्बेसिडर करण्यात आलंय. आणि त्याच्या याच जाहिरातामुळे अमेरिकेमध्ये नव्या वादाला तोंड फुटलंय. 


खेळाचं साहित्य तयार करणाऱ्या नायकी कंपनीला या निर्णयामुळे मोठ्या विरोधाला सामोर जावं लागतंय. २०१६ मध्ये एका स्पर्धेदरम्यान कॉलिन केपरनिक हा अमेरिकेच्या राष्ट्रगीताच्यावेळी गुडघ्यावर बसला होता. या वर्तणुकीमुळे केपरनिकनं अमेरिकेच्या झेंड्याचा अवमान केल्याची भावना नारिकांमध्ये आहे. आणि त्यामुळे त्यांनी नायकीचं साहित्य जाळायला सुरुवात केलीय. अमेरिकन नागरिकांचा हा विरोध सोशल मीडियावरही पहायाला मिळतोय. 


सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो नागरिकांनी शेअर करत आपला विरोध दर्शवलाय. अमेरिकेमध्ये वर्णद्वेष आणि वांशिक शेरेबाजी केली जाते. असं केपरनिकचं म्हणण आहे. आणि त्यामुळेच राष्ट्रगीताच्यवेळी आपण गुडघ्यावर बसलो असल्याचं स्पष्टीकरण त्यानं दिलं होतं. दोन दिवसांपासून हा विरोध सुरु आहे.  अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही याची गंभीर दखल घेतली आहे. आता अमेरिकेत सुरु झालेला हा वाद आगामी काळात कोणतं वळण घेणार ते पाहणे महत्त्वाचं ठरेल.