कोरोनापेक्षाही जीवघेण्या महामारीसाठी तयार राहा; WHO चा गंभीर इशारा; प्रमुख म्हणाले `जगाने आता...`
WHO Warns Pandemic: कोरोनानंतर (Coronavirus) जग सावरलं असून पुन्हा एकदा सुरळीतपणे सर्व काही सुरु आहे. पण याचदरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) एक गंभीर इशारा दिला आहे. सोमवारी जागतिक आरोग्य परिषदेच्या (World Health Assembly) बैठकीत डॉ. टेड्रोस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी कोरोना महामारी (COVID-19 pandemic) अद्याप संपली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
WHO Warns Pandemic: कोरोना महामारीचा (COVID-19 pandemic) फटका संपूर्ण जगाला बसला होता. कोरोनानुळे एकीकडे लोक जीव गमावत असताना दुसरीकडे सर्व देशांच्या अर्थव्यवस्थाही ठप्प झाल्या होत्या. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, लॉकडाउनच्या साखळीत अडकलेलं जाग आता सावरलं आहे. पण यादरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने मात्र पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) एक गंभीर इशारा दिला आहे. सोमवारी जागतिक आरोग्य परिषदेच्या (World Health Assembly) बैठकीत जागतिक आरोग्य संगटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी कोरोना महामारी अद्याप संपली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
डॉ. टेड्रोस यांनी पुढील महामारीसाठी तयार राहा असा इशाराच संपूर्ण जगाला दिला आहे. पुढील महामारी कोरोनापेक्षाही जीवघेणी असू शकते असं ते म्हणाले आहेत. कोरोनामधून जग सावरत असताना ट्रेड्रोस यांनी हा इशारा दिला आहे. ते म्हणाले आहेत की "जगाने आता पुढील महामारीसाठी तयार राहण्याची गरज आहे. पुढील महामारी कोरोनापेक्षाही भयानक असू शकते," असं टेड्रोस म्हणाले आहेत.
"कोरोनाचा जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून शेवट झाला असला तरी जागतिक आरोग्यासाठी तो धोका म्हणून अद्याप कायम आहे," असं टेड्रोस म्हणाले आहेत. "आणखी एखादा व्हेरियंट उदयाला येण्याचा धोका अद्याप कायम आहे, जो रोग आणि मृत्यूसाठी कारणीभूत ठरु शकतो. आणखी घातक संभाव्यतेसह आणखी एक रोग उदयास येण्याची शक्यता कायम आहे", असं त्यांनी सांगितलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख 76 व्या जागतिक आरोग्य परिषदेत आपला रिपोर्ट सादर करत होते. यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे. दरम्यान, आपण ज्याला सामोरं गेला आहोत त्यापेक्षाही महामारी भयानक असते असं त्यांनी सांगितलं. अशा प्रकारच्या आणीबाणी समजून घेण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी प्रभावी जागतिक यंत्रणेची गरज त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
"जेव्हा पुढील महामारी आपला दरवाजा ठोठावेल तेव्हा आपण सर्वांनी निर्णायकपणे, एकत्रितपणे त्याचा सामना करण्यास सज्ज असलं पाहिजे," असं आवाहन टेड्रोस यांनी केलं आहे.
टेड्रोस म्हणाले की कोविड-19 चा शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) अंतर्गत आरोग्य-संबंधित लक्ष्यांवर महत्त्वपूर्ण परिणाम आहेत, ज्याची अंतिम मुदत 2030 आहे. 2017 जागतिक आरोग्य परिषदेत घोषित केलेल्या तिप्पट अब्ज लक्ष्यांच्या दिशेने होणाऱ्या प्रगतीवरही साथीच्या रोगाचा परिणाम झाला आहे.