सुरक्षित राहण्यासाठी WHO ने पहिल्यादाच जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना
स्वत:ला कसे सुरक्षित ठेवावे.
नवी दिल्ली : डब्ल्यूएचओने प्रथमच खाण्यापिण्याच्या विषयी काही सूचना जाहीर केल्या आहेत. काय करावे आणि काय नाही हे जाणून घ्या.
कोरोना विषाणूसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने कित्येक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. स्वच्छता आणि सुरक्षिततेसंदर्भात अनेक मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या 5 पद्धती वापरल्या जाऊ शकतात ते जाणून घ्या.
स्वच्छतेची विशेष काळजी घ्या
कोणत्याही पदार्थांना शिजवण्यापूर्वी किंवा स्पर्श करण्यापूर्वी हात चांगले स्वच्छ धुवून घ्या. शौचालयानंतर हात चांगले धुवा. स्वयंपाक करण्यासाठी वापरण्यात येणारी सर्व भांडी धुवून स्वच्छ करा. कोणत्याही प्रकारचे किटक आणि प्राणी यांच्यापासून किचन दूर ठेवा.
हे महत्वाचे का आहे?
बहुतेक सूक्ष्मजीव रोगाचे कारण नसतात परंतु धोकादायक सूक्ष्मजीव हे गलिच्छ ठिकाणी, पाणी आणि प्राण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. हे सूक्ष्मजीव सहजपणे भांडी, स्वयंपाकघरातील इतर कपडे आणि कटिंग बोर्डमध्ये सहज सापडतात. जे हाताने जेवणामध्ये पोहोचू शकतात. अनेक प्रकारचे रोग यामुळे उद्भवू शकतात.
कच्चं आणि शिजवलेले अन्न वेगळे ठेवा
कच्चे मांस, कोंबडी किंवा समुद्रातील मासे इतर पदार्थांपासून दूर ठेवा. कच्च्या अन्नासाठी साहित्य आणि भांडी वेगळे करा. दुसरे अन्न शिजवण्यासाठी कच्च्या खाद्यपदार्थांमध्ये कटिंग बोर्ड आणि चाकू वापरु नका. कच्चे आणि शिजवलेल्या अन्नामध्ये अंतर ठेवण्यासाठी, त्यांना झाकून ठेवा.
हे महत्वाचे का आहे?
कच्चे अन्न, विशेषत: मांस, पोल्ट्री, सीफूड आणि त्यांच्या रसात धोकादायक सूक्ष्मजीव असू शकतात. ते स्वयंपाक करताना एका जेवणापासून दुसर्या जेवणात जाऊ शकतात, म्हणून ते वेगळे ठेवणे महत्वाचे आहे.
अन्न चांगले शिजवावे
विशेषत: मांस, अंडी, चिकन आणि सीफूड चांगले शिजवून घ्यावे. त्यांना 70 डिग्री सेल्सिअस तापमानात हळूहळू उकळू द्यावे किंवा चांगले शिजवावे. त्याचा सूप बनवताना खात्री करुन घ्या की तो गुलाबी दिसत नाही ना. ते शिजवल्यानंतर स्पष्ट दिसायला हवे. आपण तापमान तपासण्यासाठी थर्मामीटर देखील वापरू शकता. शिजवलेले पदार्थ खाण्यापूर्वी पुन्हा एकदा गरम करावे.
हे महत्वाचे का आहे?
योग्य प्रकारे स्वयंपाक केल्याने सर्व जंतूंचा नाश होतो. 70 डिग्री सेल्सिअस तापमानावर शिजविलेले अन्न खाणे सुरक्षित आहे. मांस आणि कोणत्याही सीफूड जेवणात विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
अन्न सुरक्षित तापमानात ठेवा
2 तासांपेक्षा जास्त काळ शिजवलेले अन्न घराच्या तापमानात ठेवू नका. शिजवलेले पदार्थ योग्य तापमानात किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. अन्न वाढताना कमीतकमी 60 डिग्री सेल्सिअस तापमानावर चांगले गरम करा. फ्रिजमध्ये जास्त वेळ अन्न ठेवू नका.
हे महत्वाचे का आहे?
खोलीच्या तापमानावर ठेवलेल्या अन्नात सूक्ष्मजीव खूप वेगाने वाढतात. 5 अंशापेक्षा कमी आणि 60 अंशांपेक्षा जास्त, हे सूक्ष्मजीव वाढणे थांबवतात. पण काही धोकादायक जंतू 5 डिग्रीपेक्षा कमी तापमानातही वाढतात.
स्वच्छ पाणी वापरा
पिण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी नेहमी स्वच्छ पाण्याचा वापर करा. शक्य असल्यास, पिण्यापूर्वी पाणी उकळवा. भाज्या आणि फळे चांगले धुवा. ताजे आणि पौष्टिक पदार्थ घ्या. सुरक्षिततेच्या बाबतीत पाश्चरयुक्त दूध अधिक चांगले आहे. कालबाह्य तारखेनंतर अन्न वापरू नका.
हे महत्वाचे का आहे?
पाणी आणि बर्फातही बहुतेकदा धोकादायक सूक्ष्मजीव वाढतात. ज्यामुळे पाणी विषारी बनते. कच्च्या खाद्यपदार्थांची काळजीपूर्वक खरेदी करा. धुतल्यानंतर ते सोलावे किंवा चिरून घ्यावे. यामुळे त्यांचे निर्जंतुकीकरण होते.