Marburg Virus Fatality Ratio: जगभरातून अद्यापही कोरोनानं (Coronavirus) काढता पाय घेतलेला नाही. अधूनमधून या विषाणूचा संसर्ग फोफावतो आणि आरोग्य यंत्रणांची चिंता पुन्हा वाढते. ही परिस्थिती आटोक्यात येत नाही, तोच आणखी एका विषाणूच्या संसर्गामुळं जागतिक आरोग्य संघटनाही सतर्क झाल्याचं पाहायला मिळतोय. दक्षिण आफ्रिकन राष्ट्र Equatorial Guinea मध्ये हा नवा विषाणू फोफावण्यास सुरुवात झाली आहे. मारबर्ग वायरस (Marburg Virus) असं या विषाणूचं नाव असून, त्यामुळं आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. चिंतेचा मुद्दा म्हणजे हा विषाणू कोरोनापेक्षाही जास्त घातक असल्याचं सांगण्यात येत आहे. 


मारबर्ग संसर्गाची लक्षणं काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इक्वेटोरियल गिनी (Equatorial Guinea)मध्ये सापडलेल्या मारबर्ग विषाणूच्या रुग्णांमध्ये छातीत वेदना, ताप अशी प्राथमिक लक्षणं दिसली. या विषाणूचा संसर्ग इतका घातक आहे, की यावर वेळीच उपचार न झाल्यास रुग्णाचा मृत्यूही ओढावू शकतो. 


मृत्यूदराचा आकडा 88 टक्क्यांहूनही जास्त असेल 


मारबर्ग विषाणूचा संसर्ग इतका घातक आहे, की यामुळं होणारा मृतांचा आकडा वाढून हे प्रमाण 88 टक्क्यांवर पोहोचू शकतं. WHO मधील डॉ. मातशिदिसो मोइती यांनी हा संसर्ग अतिशय वेगानं जगभरात पसरू शकतो अशीही भीती व्यक्त केली. जागतिक आरोग्य संघटनेकडून नागरिकांना या संसर्गाच्या धर्तीवर सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय संक्रमित रुग्णांची Contract tracing, विलगीकरण आणि आजारपणाची इतरही लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांबाबत आरोग्य यंत्रणांना काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करावी असं आवाहनही केलं आहे. 


हेसुद्धा वाचा : Milk Chicken Price Hike : दुधाचे दर प्रतीलिटर 110 रुपये, डाळी- चिकनचे भावही वधारले; महागाईनं पळवला तोंडचा घास


संसर्गाचं कारण काय?


तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हा विषाणू वटवाघुळांमधून माणसांमध्ये आला असून, विषाणूची लागण झालेल्या रुग्णानं कोणत्याही पृष्ठाला स्पर्श केल्यास, त्या व्यक्तीच्या शरीरातून द्रव्य स्त्रवत असल्यास त्याच्या संपर्कात येणाऱ्यांनाही हा संसर्ग होऊ शकतो. अद्यापही या विषाणूचा नायनाट करणारी कोणतीही लस बाजारात आलेली नाही, ही बाब लक्षात घेणं महत्त्वाचं.