मुंबई : उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांची बहीण किम यो-जोंग कडे देशातील दुसरा महत्त्वाचा चेहरा म्हणून पाहिले जातं. 11 एप्रिल 2020 रोजी उत्तर कोरियाच्या पोलिटब्यूरोमध्ये किम यो-जोंगला वैकल्पिक सदस्य म्हणून पुन्हा नियुक्त केले गेले. किम यो-जोंग यांनीही देशाच्या बाहेर उत्तर कोरियाचे प्रतिनिधित्व केले आहे.
 
किम जोंग उनच्या प्रकृतीबाबत काही बातम्या समोर येत आहेत. अमेरिकन अधिकाऱ्यांचा हवाला देत सीएनएनने आपल्या अहवालात म्हटले आहे की हृदय शस्त्रक्रियेनंतर किमची प्रकृती गंभीर आहे. पण याची पुष्टी झालेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेली मेलच्या अहवालानुसार दक्षिण कोरियाच्या सेजोंग संस्थेचे विश्लेषक चोंग सोंग चांग म्हणतात की, किम जोंग उन यांची बहीण उत्तर कोरिया सरकारमध्ये यापूर्वीच प्रभावी भूमिका निभावत आहे.


द गार्डियन डॉट कॉमच्या अहवालानुसार, किम जोंग यांची देशात आणि जगात जी प्रतिमा आहे. त्यामध्ये त्यांच्या बहिणीचा मोठा हात असल्याचं बोललं जातं. 2018 मध्ये दक्षिण कोरियामध्ये झालेल्या हिवाळी ऑलिम्पिक दरम्यान किम यो-जोंग यांनी उत्तर कोरियाच्या पथकाचे प्रतिनिधित्व केले.


किम यो-जोंग यांनी मार्चमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक केले होते. कारण ट्रम्प यांनी त्यांना पत्र लिहून म्हटलं होतं ती, दोन्ही देश चांगले द्विपक्षीय संबंध टिकवून ठेवतील अशी त्यांना आशा आहे. कोरोनाच्या संकटात ट्रम्प यांनी कोरियाला मदत करण्याबाबतही वक्तव्य केलं होतं.


किम जोंग उन यांची बहिण डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दोनदा झालेल्या शिखर बैठकीत त्यांच्या सोबत होती. गार्डियनच्या अहवालानुसार, सिडनी येथील इंटरनॅशनल कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे ज्येष्ठ व्याख्याते आणि उत्तर कोरिया प्रकरणातील तज्ज्ञ लिओनिड पेट्रोव्ह यांचे म्हणणे आहे की किम यो-जोंग यांचा किम जोंग उनवर थेट प्रभाव आहे.