जपानमध्ये नेहमीच क्लीन शेव्ह का असतात पुरूष? हे आहे कारण
Japanese Boys Beards: जपान देशातील लोक दाढी का वाढवत नाहीत, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? तर मग आज याचे उत्तर जाणून घेऊया.
Japanese Boys Beards: जपान देशातील नागरिकांच्या चेहऱ्याची ठेवण एका विशिष्ट्य प्रकारची असते. तुम्ही कधी पाहिलं असेल तर जपानी नागरिक कधीच दाढी वाढवत नाहीत. अशावेळी तुम्हाला जपानमध्ये नागरिक दाढी का वाढवत नाहीत नेहमीच क्लीन शेव्ह का करतात, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का. जपानी नागरिक जाणुनबुझून दाढी ठेवत नाहीत की हे अनुवंशिक आहे. तसं पाहायला गेलं तर थंड प्रदेश असलेल्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या शरीरावर खूप केस असतात आणि जपानमधील वातावरणही नेहमी थंड असते. मग जपानी नागरिक दाढी का वाढवत नाहीत. जाणून घेऊया यामागचे कारण
जगातील प्रत्येक प्रदेशानुसार व्यक्तीच्या चेहऱ्यातील ठेवण बदलत जाते. काही देशांत पुरुषांना दाढी व मिशी असणे हे पुरुषत्वाशी जोडले जाते. पण जपानमध्ये अशी मान्यता नाहीये. जपानमधील बहुतांश पुरुष हे कधीच दाढी व मिशी ठेवत नाहीच ते नेहमीच क्लीन शेव्हमध्ये दिसतात. जपानमधील पुरुषांना दाढी येतच नाही का? असेही प्रश्न उपस्थित होतात. मात्र ते खरं नाहीये. जपानमधील मोठ-मोठ्या सेलिब्रिटीही नेहमीच क्लीन शेव्हमध्ये दिसतात.
खरं कारण काय?
जपानी पुरुषांना दाढी येतंच नाही हा एक भ्रम आहे. तेदेखील जगातील इतर पुरुषांप्रमाणे दाढी वाढवू शकता. मात्र, अन्य पुरुषांच्या तुलनेत त्यांच्या चेहऱ्यावर कमी केस येतात. यामागील एक कारण म्हणजे जपानी पुरुषांच्या चेहऱ्यावर EDAR नावाच्या जीनमुळं कमी केस येतात. हिच अनुवंशिकता नव्या पिढीकडे ट्रान्सफर होत आहे.
टेस्टोस्टेरॉन नावाच्या हार्मोनमुळं चेहऱ्यावर दाढी आणि मिशा येतात. ज्या पुरुषामध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल जास्त असते, अशा पुरुषांच्या शरीरावर केसांची वाढ वेगाने होत असते. दाढी असणे हे सक्रीय टेस्टोस्टेरॉनचे लक्षण मानले जाते. 19-38 वर्षांच्या मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉनचा स्तर 264-916 नॅनोग्राम प्रति डेसीलीटर (एनजी/डीएल) पर्यंत असावे, असं म्हटलं जाते. यामुळंच पूर्व आशियातील पुरुषांमध्ये केसांची वाढ खुंटते.
मग का नाही ठेवत जपानी पुरुष दाढी?
जपानी मुलांना व पुरुषांना दाढी येते मात्र खुप कमी प्रमाणात येते. दुसऱ्या देशात दाढी व मिश्या ठेवणे म्हणजे पुरुषत्वाशी संबंध मानला जातो. मात्र, जपानी मान्यतेनुसार, दाढी वाढवणे म्हणजे अशुद्ध, आळशी, अस्वच्छता असल्याचे मानले जाते. याचकारणामुळं जपानी लोक दाढी व मिशा ठेवण पसंत करत नाहीत. त्यांच्या मान्यतेनुसार, डोळ्यांची सुंदरता ही सर्वश्रेष्ठ आहे आणि हेच कारण आहे की जपानी लोक अजिबात दाढी वाढवत नाहीत. नेहमीच क्लीन शेव्ह करतात.