फ्रीजमध्ये बर्फ तयार होत नाही? जाणून घ्या त्या मागचे कारण
Refrigerator Cooling Tips: तुमच्या फ्रीजमध्ये तयार होत नाही बर्फ किंवा तयार होतोय खूपच बर्फ त्याचं नेमक कारण काय आणि का होतेय ही समस्या... तुम्हाला माहितीये का कारण आणि इतकंच काय तर त्याला कसं कराल ठीक ते जाणून घेऊया...
Refrigerator Cooling Tips in Marathi: रेफ्रिजरेटर म्हणजेच फ्रीज हे आपल्याला आता प्रत्येकाच्या घरात पाहायला मिळतं. पाणी थंड राहण्यापासून भाजी-पाला आणि त्यासोबतच दुध आणि इतर काही गोष्टी खराब होण्यापासून वाचवते. फ्रीज हे साधारणपणे10-15 वर्षे आरामत जातं. इतकी वर्षे फ्रीज वापरल्यानंतर काही समस्या असेल तर त्याचं कारण हे की तुम्हाला आता नवीन फ्रीज घेण्याची गरज आहे. पण जर तुमचं फ्रीज हे खराब होण्याआधीच जर फ्रीजरमध्ये बर्फ जास्त किंवा कमी होत असेल तर त्याला लगेच ठीक कराल. पण त्याचं कारण तुम्ही फ्रीजची काळजी घेत नाही म्हणून देखील हे होतं.
फ्रीझरमध्ये जास्त प्रमाणात बर्फ जमा झाल्यामुळे कूलिंग व्हेंट्स आणि कॉइल्स ब्लॉक होऊ शकतात, ज्यामुळे कूलिंग खराब होते. असे झाल्यास, हा बर्फ काढून त्यानंतर फ्रीज नॉर्मल टेम्परेचरवर ठेवा.
कंडेन्सर कॉइल्समध्ये कचरा
कंडेन्सर कॉइलमध्ये कचरा जमा झाला असेल तर फ्रीझरची कूलिंगची क्षमता कमी होऊ शकते आणि बर्फ तयार होणं कमी होऊ शकतं. कंडेन्सर कॉइल साफ करण्यासाठी, आपण व्हॅक्यूम क्लिनर किंवा ब्रश वापरू शकता. साफसफाई करण्यापूर्वी फ्रीज अनप्लग केल्याची खात्री करा.
हेही वाचा : तुम्हालाही पाहिजेत मजबूत आणि लांब केस मग 'हे' आहेत Best Hair Oil
खराब फ्रीझर थर्मोस्टॅट
जर फ्रीझर बर्फ तयार करत नसेल किंवा पुरेसे थंड होत नसेल तर थर्मोस्टॅट तपासा. थर्मोस्टॅट सर्वात कमी ते सगळ्यात जास्त सेटिंगमध्ये तपासून पाहा. जर त्याचा आवाज येत असेल तर ते खराब झालं आहे असं समजा.
फ्रीजचं कंप्रेसर तपासा
जर तुम्ही फ्रीझरचे इतर सर्व भाग तपासले असतील आणि समस्या आढळली नसेल तर, खराब कंप्रेसर याचं कारण असू शकतं. कोणत्याही समस्येचे निदान करण्यासाठी तुम्ही किमान 30 मिनिटे कंप्रेसरचा आवाज ऐकू शकता. गुनगुन आवाज नसल्यास, कंप्रेसर योग्यरितीने काम करत नसेल हे शक्य आहे.
याव्यतिरिक्त, फ्रीज हे जास्त सामान असल्यानं देखील ही समस्या उद्भवू शकते. जितका सामान ठेवण्याची त्याची समस्या आहेत त्याहून जास्त ठेवल्यानं देखील फ्रीज ठंड होत नाही.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)