नवी दिल्ली : भारताच्या अवकाश संशोधनातील भरारीने पाकिस्तानला पोटसूळ उठला आहे.


100वा उपग्रह अंतराळात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्त्रोशी तुलना करता अवकाश संशोधनात मैलोंगणती मागे असलेल्या पाकिस्तानाने पोटदुखीतून मल्लीनाथी केली आहे. इस्त्रोने एकाच वेळी 31 उपग्रह अंतराळात सोडत नवा विक्रम केला आहे. याचवेळी भारताचा 100वा उपग्रह अंतराळात सोडण्यात आला आहे.


पाकची पोटदुखी


पाकिस्तानने स्वत:च्या गुणधर्माला अनुसरून इस्त्रोच्या गरुडझेपेकडे दुर्लक्ष केलं आहे. किंबहुना उपग्रहांच्या प्रक्षेपणाआधीच पाकिस्तानने भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने पोटदुखीतून भारताने या उपग्रहाचा वापर लष्करी हेतूने करत द. आशियातील परिस्थिती अस्थिर करू नये, असं म्हटलंय.


पाकिस्तानचा आगाऊपणा


सर्व अंतराळ तंत्रज्ञान हे नागरी आणि लष्करी कामासाठी वापरलं जाऊ शकतं. भारताने आपल्या उपग्रहाचा वापर लष्करी हेतूने करून दक्षिण आशियात वातावरण अस्थिर करू नये. असं आपल्या वक्तव्यात पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.


इस्त्रोची कमाल


पाकिस्तानने आपल्या अंतराळ संशोधनाची सुरूवात 1961 साली म्हणजेच भारताच्या आठ वर्षं आधी सुरू केला होता. पण इस्त्रोने दरम्यानच्या काळात गगन भरारी घेत नुसतं पाकिस्तानलाच मागे नाही टाकलं तर जगभरात आपला दर्जा सिद्ध केला. इस्त्रो आता जगातील सर्वात अग्रगण्य अंतराळ संशोधन संस्था तर आहेच पण आता तिची तुलना नासाशी केली जाते.