Video : नवऱ्याच्या कॉफीमध्ये पत्नीने मिक्स केलं `ब्लीच`, हत्येचा भयानक कट रचतानाचा व्हिडीओ समोर
Viral Video : पत्नीने आपल्याच पतीला जीवे मारण्यासाठी त्याच्या कॉफीमध्ये ब्लीच मिक्स केलं आणि मग...या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Viral Video : सोशल मीडियावर एका भयानक कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक महिला कॉफीमध्ये ब्लीच मिक्स करताना दिसत आहे. ही महिला आपल्याच पतीला मृत्यूच्या दारात धाडण्यासाठी कट रचत आहे. हत्येचा भयानक कट रचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. त्यानंतर एकच खळबळ माजली आहे. (wife mix bleach in husbands coffee to kill shocking video get viral trending news)
मिळालेल्या माहितीनुसार या दोघा नवऱ्या बायकोमध्ये सतत भांडणं व्हायची. एवढंच नाही तर या जोडप्याने घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली आहे. पण तरीदेखील पत्नीने एवढं टोकाचं पाऊल उचल्याचं पाहून पोलिसांनीही धक्का बसला आहे. रोजच्या भांडणाला कंटाळून तिने पतीच्या हत्येचा कट रचल्याचं संशय आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
ही घटना अमेरिकेतील असून त्या महिलचं नाव मेलोडी आहे तर नवऱ्याचं नाव रॉबी असं आहे. तिचा नवरा कामासाठी जर्मनी आणि अॅरिझोनामध्ये जायचा. त्यांच्यामध्ये अनेक कारणावरून भांडण व्हायची. मेलोडी या भांडणाला कंटाळून तिने एकेदिवशी त्याला मारण्याचा कट रचला. आपण रचलेला कट कधी उघड होणार नाही, असं तिला वाटलं होतं.
त्यांच्या नात्यामध्ये अतिशय तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे रॉबीदेखील सावध झाला होता. त्याला पत्नीच्या वागण्यावर कायम संशय यायचा. म्हणून त्याने घरात गुप्त कॅमेरा लावला होता. मेलोडी त्याला कॉफी द्यायची तेव्हा त्याला त्या कॉफीची चव विचित्र वाटत होती. त्याला संशय आला त्याने ती कॉफीची चाचणी करण्याचं ठरवलं. त्याने लगचेच केमिकल टेस्टिंग स्ट्रिप्स विकत घेतल्या आणि कॉफीची चाचणी केली.
या टेस्टमध्ये त्या कॉफीमध्ये क्लोरीनचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलं. हे पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. अनेक वेळा त्याने या विचित्र चवीची कॉफीचं सेवन केलं आहे. आता बायकोचं हे भयानक कृत्य जगासमोर आणण्यासाठी त्याने जे घरात गुप्त कॅमेरा लावला होता. त्यात त्याने किचनमध्येही कॅमेरा लावला होता. त्यात ती कॉफीमध्ये ब्लीच मिक्स करताना दिसून येते आहे.
नवरा रॉबी यांनी आरोप केला आहे की, प्रॉपर्टीसाठी तिने मला संपवण्याचा कट केल्याचा आरोप केला आहे. त्याने या संदर्भात कोर्टात कागदपत्रही दाखल केले आहेत. या घटनेनंतर मेलोडीवर पतीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोपांसाठी तिला $2,50,000 च्या बाँडवर तुरुंगात डांबण्यात आलं आहे.
दरम्यान ट्वीटर म्हणजे X वरील 1776 हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.