Wife Stealing Festival: जगाच्या कानाकोपऱ्यात विविध प्रकारच्या जाती-जमाती वास्तव्य करत असतात. यांच्या प्रथा-परंपरा वेगवेगळ्या आणि थक्क करणाऱ्या असतात. एखादी गोष्ट एका ठिकाणी चांगली मानली तर तीच गोष्ट दुसऱ्या क्षेत्रात वाईट ठरते.लग्नाशी संबंधित चालीरीतींच्या अनेक विचित्र गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील. सुरुवातीच्या काळात स्वयंवर असायचे. ज्यामध्ये महिलेसोबत लग्न करण्यासाठी पुरुषाला पराक्रम गाजवावा लागायचा. अशा काहीशा परंपरा आफ्रिकन जमातींमध्ये आजही पाहायला मिळतात. सध्याच्या जमान्यात असं काही ऐकायला मिळालं की विचित्र वाटतं. दरम्याम आदिवासींमध्ये पाळल्या जाणार्‍या परंपरांबद्दल जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या देशातील अनेक ठिकाणी मुलगी बघायचा कार्यक्रम असतो. ज्यामध्ये मुलगा मुलीच्या घरी जातो. त्यावेळी मुलगी  नटून-थटून राहते. पण अशीदेखील एक परंपरा आहे जिथे मुलगा मेक-अप करून तयार होतो आणि होणाऱ्या नववधूला आकर्षित करतो. यासाठी विविध वस्त्र परिधान करतो, नाचतो, जे काही शक्य होईल ते सर्व करतो. डेली स्टारने या अनोख्या परंपरेविषयी माहिती दिली आहे. 


सहारा वाळवंटाच्या काठावर राहणाऱ्या जमातीमध्ये अशी संस्कृती आहे. येथे वर लग्नासाठी वधूला आकर्षित करण्यासाठी मेकअपसह जातो. कॅमेरून आणि नायजेरियामध्ये राहणाऱ्या नायजर जमातीमध्ये बायका शोधण्याची पद्धत वेगळी आहे. याला बायका चोरण्याचा सण म्हणतात. त्याला गुएरेवॉल फेस्टिव्हल म्हणतात. यामध्ये पुरुष चेहऱ्यावर भारी मेकअप करून तयार होतात आणि मुलींना आकर्षित करण्यासाठी नाचतात. 


यानंतर पुढचा टप्पा सुरु होतो. कोणत्या पुरुषाला पसंद करायचे हे सर्वस्वी महिलेवर अवलंबून असते. जर एखाद्या मुलीला पुरुषाची कला आवडली, ती प्रभावित झाली किंवा तिला एखादा पुरुष आवडला तर ते सांगण्याचीही वेगळी पद्धत आहे. अशावेळी ती हळूवारपणे पुरुषाच्या खांद्यावर हात ठेवते. आपली प्रेमसंबंध किंवा वैवाहिक संबंध ठेवण्यास सहमती असल्याचे ती या कृतीतून दर्शवते. 


न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या एक्सप्लोरर झेन पार्कर यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर या परंपरेबद्दल सांगितले. एखाद्या सौंदर्य स्पर्धेप्रमाणेच ही स्पर्धा चर्चेत असते. पुरुष केवळ मेकअप करता, सुंदर कपडे आणि सजावटीच्या वस्तू देखील घालतात. एक खास प्रकारचा डान्स करून आपली ताकद दाखवतात. एखादी मुलगी आपल्या पसंत करेल, असे त्यांना वाटते.


हा सण वर्षातून एकदा येतो आणि पुरुष तासनतास मेहनत करून त्याची तयारी करतात. कधीकधी मुली पुरुषांना संपूर्ण आयुष्यासाठी निवडतात तर कधीकधी फक्त एका रात्रीसाठी. विशेष म्हणजे विवाहित महिलाही या उत्सवात सहभागी होतात आणि पुरुषांची निवड करतात. 


(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)