Sunita Williams Starliners Helium leak : अंतराळात अडकलेल्या सुनीता विलियम्स यांच्या पृथ्वीवर परतण्याच्या दिवसाची प्रतीक्षा दिवसागणिक आणखी लांबत असून, आता अवकाशात त्यांच्यापुढं आलेल्या या अडचणी नेमक्या कधी संपणार हाच चिंतातूर करणारा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. याच चिंतेमध्ये एक आशेचा किरण दिसल्यामुळं सध्या सुनीला विलियम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांना माघारी आणण्यासाठीच्या हालचालींना वेग येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार आता जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून गणल्या जाणाऱ्या एलॉन मस्क यांची स्पेस एक्स ही संस्था NASA ला या संकटात मोठी मदत करणार असल्याचं सांगितलं जात आहे. सुरुवातीपासूनच नासाच्या बोईन स्टारलायनरच्या प्रवासात अडचणी आल्याचं पाहायला मिळालं, ज्यामुळं त्याचं उड्डाणही टाळण्यात आलं होतं. पुढं 6 जूनरोजी  Boeing Starliner अंतराळात असणाऱ्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचलं. पण, आता मात्र ते परतण्याच्या शक्यता आणि प्रयत्न अपयशी ठरताना दिसत आहेत. हेलियम गळतीमुळं बोईंगच्या परतीच्या प्रवासात अडचणी निर्माण होत असल्याची प्राथमिक माहिती नासाकडून देण्यात आली आहे. 


दरम्यान, येत्या काळात अंतराळात अडकलेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी एक नवं यान पाठवलं जडाणार असून, या मोहिमेमध्ये एलॉन मस्क यांची स्पेस एक्स तारणहार ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. न्यूयॉर्क युनिवर्सिटीतील एयरोस्पेस इंजिनियरिंगचे प्राध्यापक कात्सुओ कुराबायशी यांच्या माहितीनुसार स्टारलायनरची सद्यस्थिती पाहता नासाच्या अंतराळवीरांना सुरखरुप परत आणण्यासाठी स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगनसारख्या अंतराळयानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पण, नासा आणि बोईंग स्टारलायनरशी संलग्न असणाऱ्यांनी मात्र या पर्याला केंद्रस्थानी ठेवलेलं नाही हेसुद्धा तितकंच खरं.


हेसुद्धा वाचा : 'या' बड्या बँकेतून 500 कर्मचाऱ्यांना नारळ; IT मागोमाग आता बँकिंग क्षेत्रावर नोकरकपातीची तलवार


तज्ज्ञांच्या मते जुलै महिन्यापर्यंत अंतराळातील अवकाशयात्रींचं पृथ्वीवर परतणं लांबणीवर पडलं तरीही फारशा अडचणी निर्माण होणार नाहीत पण, त्यानंतर मात्र परिस्थिती आणखी आव्हानात्मक ठरू शकते. तेव्हा आता नासा नेमक्या कोणत्या पर्यायांची निवड करून सुनीला विलियम्स आणि विल्मोर यांना परत आणतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.