'या' बड्या बँकेतून 500 कर्मचाऱ्यांना नारळ; IT मागोमाग आता बँकिंग क्षेत्रावर नोकरकपातीची तलवार

Bank Jobs Layoff Latest news : बँकेत किंवा बँकेशी संलग्न नोकरी करणाऱ्यांसाठी धोक्याची सूचना... मागील काही दिवसांपासूनच्या बदलांचा विचार करा...

सायली पाटील | Updated: Jun 26, 2024, 01:11 PM IST
'या' बड्या बँकेतून 500 कर्मचाऱ्यांना नारळ; IT मागोमाग आता बँकिंग क्षेत्रावर नोकरकपातीची तलवार title=
Yes Bank Lays Off 500 Workers shocked banking sector latest news

Bank Jobs Layoff Latest news : संपूर्ण जगावर ओढावलेलं आर्थिक संकट आणि त्या संकटाचे एकंदर परिणाम पाहता फक्त माहिती आणि तंत्रज्ञान अर्थात IT च नव्हे, तर इतरही क्षेत्रांमध्ये नोकरपातीचे संकेत मिळू लागले आहे. किंबहुना काही खासगी आस्थापनांनी त्यांच्या कर्मचारी संख्येत मोठी कपात करण्यास सुरुवातही केली आहे. ज्यामुळं कर्मचारी वर्गापुढं आता कैक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. 

IT मागोमाग सध्या नोकरकपातीच्या आगीत होरपळणारं आणखी एक क्षेत्र म्हणजे Banking Sector. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार खासगी क्षेत्रातील एक महत्वाची बँक म्हणून नावारुपास आलेल्या Yes Bank मधून जवळपास 500 हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आलं आहे. (YES Bank Layoff)

500 कर्मचाऱ्यांना नारळ देणाऱ्या या बँकेत येत्या काळात आणखी काही कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बँकेकडून कॉस्ट कटिंगसह या कर्मचारी कपातीमागे इतरही काही कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. 

हेसुद्धा वाचा : कोण होते मुंबई रेसकोर्सचे मालक? आज 1 BHK ही येणार नाही इतक्या किंमतीत झालेला 225 एकरांच्या भूखंडाचा व्यवहार

 

येस बँकेकडून ज्या 500 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, त्या सर्व कर्मचाऱ्यांना बँकेनं 3 महिन्यांचं वेतन देऊ केलं आहे. बिझनेस टुडेच्या माहितीनुसार पुढील काही महिन्यांमध्ये नोकर कपातीचं आणखी एक सत्र पार पडणार असून, बँकेच्या यादीत आणखी काही कर्मचाऱ्यांच्या नावाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्याच्या घडीला झालेल्या कर्मचारी कपातीमुळं होलसेल आणि रिटेल अशा दोन्ही युनिटवर सर्वाधिक परिणाम झाल्याचं सांगितलं जात आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार येस बँकेच्या रिस्ट्रक्चरिंग प्रोसेसअंतर्गत ही नोकरकपात करण्यात आली आहे. यामध्ये Cost Cutting चच कारण सांगण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून बँकेनं डिजीटल बँकिंगवर अधिक भर दिला असून, परिणामी मानवी कार्यपद्धतीचा कमीत कमी वार केला जाण्याकडे बँकेचा कल दिसत आहे. याशिवाय काही खर्चांचा आकडा मोठ्या फरकानं कमी करण्यासाठी बँकेनं हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. 

येस बँकेत झालेल्या या नोकरकपातीमुळं येत्या काळात बँकेच्या शेअरवरही याचा परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंगळवारी बँकेच्या शेअरची किंमत 24.02 रुपये इतकी होती. तर, बुधवारी शेअरची किंमत किरकोळ तुटीसह 23.90 रुपये इतकी पाहायला मिळाली होती. पुढील काही दिवसांमध्ये या शेअरवर सर्वांच्याच नजरा असतील असं म्हणायला हरकत नाही.