Trending News In Marathi: McDonald चे जगभरात अनेक रेस्तराँ आहेत. लहान मुलांचे सगळ्यात आवडते फास्ट फुड म्हणजे बर्गर आणि फ्रेंच फ्राईस. लहान मुलांबरोबरच अगदी तरुणही McDonaldचे चाहते आहे. छोटे-मोठे सेलिब्रेशन करण्यासाठी तसंच, लहान मुलांच्या बर्थ-पार्टीही McDonald मध्ये साजरी केली जाते. तसंच, लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने हॅपी मिल बॉक्सदेखील आणला आहे. यामध्ये बर्गर, फ्रेंच फ्राइज आणि त्यासोबतच एक छोटेसे खेळणं देण्यात येते. लहान मुलंही खेळणे मिळेल या आशेने मिल बॉक्स घेतात. मात्र, एका महिलेसोबत मात्र भलताच प्रकार McDonald मध्ये घडला आहे. तिने तिचा हा अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडमध्ये हा प्रकार घडला आहे, 18 ऑक्टोबर रोजी 35 वर्षांच्या जेम्मा किर्क-बोनर हिने एका McDonald रेस्तराँमधून हॅपी मील खरेदी केले होते. ती घरी गेल्यानंतर तिने तिचा 1 वर्षांचा मुलगा कालेब आणि 3 वर्षांचा मुलगा जॅक्सन यांना हॅपी मील खाऊ घालू लागली. त्याचवेळी बॉक्समध्ये तिला सिगारेटची राख सापडली. आपल्या मुलांसाठी घेतलेल्या जेवणात सिगारेटची राख सापडल्याने तिला मोठा धक्का बसला. 


जेम्मा किर्क-बोनर हिने सोशल मीडियावर याचा फोटो शेअर करत आपला अनुभव मांडला आहे. तसंच, McDonald ने माफी मागावी, अशी मागणीही तिने केली आहे. जिम्माने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत एक कॅप्शन लिहलं आहे की, खेळण विसरुन जा, आता अतिरिक्त चव येण्यासाठी सिगारेटची राखसुद्धा देण्यात आली आहे. आणि तक्रार करण्यासाठी फोन केला असता माझ्यासोबत उद्धट शब्दात वाद घालण्यात आला. त्यानंतर मी फोन ठेवून दिला.



लॅटन रोड रेस्टॉरंटचे फ्रँचायझी मार्क ब्लंडेल यांनी द मेलला सांगितले: “आमच्यासाठी अन्न सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे आणि आम्ही आमच्या बॅरो-इन-फर्नेस रेस्टॉरंटमध्ये गुणवत्ता नियंत्रण आणि आमच्या ग्राहकांना सर्वोच्च मानके प्रदान करण्यावर खूप भर देतो. आम्ही प्रोत्साहन देतो. ग्राहकांनी ग्राहक सेवेशी संपर्क साधावा जेणेकरुन आम्ही योग्यरित्या तपास करू आणि त्यांना निराकरण करण्यात मदत करू."