मुंबई : लंडनहून कोचीला  (London to Kochi) येणाऱ्या एअर इंडियाच्या  (Air India) विमानात मंगळवारी एका मुलाचा जन्म झाला. या विमानातून एक गरोदर महिला प्रवास करत होती. विमानात 200 प्रवासी होते. यामध्येही महिला होती. अचानक तिला प्रसूती वेदना सुरु झाल्या, त्यानंतर विमान क्रमांक AI 150 मध्ये उपस्थित दोन डॉक्टर आणि चार परिचारिका यांनी महिलेची प्रसूती केली. मुलाचे रडणे ऐकताच प्रवाशांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले.


विमान फ्रँकफर्टला नेले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेने एका मुलाला जन्म दिला आहे. महिलेला वैद्यकीय सेवेची गरज असल्याने विमान फ्रँकफर्टला (Frankfurt) वळवण्यात आले. ती महिला, नवजात आणि दुसरा प्रवासी तेथे उतरला आणि त्यांना फ्रँकफर्ट (Frankfurt) येथील रुग्णालयात नेण्यात आले. नंतर विमान कोचीकडे रवाना झाले.


आई आणि नवजात बाळाची प्रकृती उत्तम


एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, नवजात मुलाची प्रकृती ठीक आहे. आई, नवजात आणि आणखी एका प्रवाशाला फ्रँकफर्टहून (Frankfurt) कोचीला नंतर एअर इंडियाच्या विमानाने  (Air India) आणले जाईल. एअर इंडियाच्या धोरणानुसार, 32 आठवड्यांपर्यंतची गर्भवती महिला डॉक्टरांच्या फिट-टू-फ्लाय प्रमाणपत्राशिवाय प्रवास करू शकते. यापेक्षा जास्त काळ असल्यास, गोरदर महिलेला प्रथम डॉक्टरांची परवानगी घ्यावी लागते.


लवकरच परत आणले जाईल


मीडिया रिपोर्टनुसार, ज्या महिलेने विमानामध्ये मुलाला जन्म दिला, त्याने चेक-इन काउंटरवर सुमारे 29 आठवड्यांची गरोदर असल्याचे कागदपत्र दाखवले. मात्र, या महिलेचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. एअरलाइन्सने फक्त एवढेच सांगितले आहे आणि महिला आणि नवजात दोघेही ठीक आहेत आणि लवकरच फ्रँकफर्टहून (Frankfurt) कोचीला आणले जातील.