बिजिंग :  एका देशातून दुसऱ्या देशात सोने किंवा महागड्या वस्तुंची तस्करी करण्यासाठी नवनवीन फंडे वापरले जातात. मात्र चीनमध्ये एका महिलेने १०५ आयफोन चोरून नेण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनी महिलेने आपल्या कपड्यांमघ्ये १०५ आयफोन लपवून हाँगकाँगला तस्करी करण्याचा प्रयत्न केला.


मात्र ही महिला पकडली गेली, तिला शेन्जेनमध्ये अटक करण्यात आली. चायनीज न्यूज साईट XMNN ने दिलेल्या बातमीनुसार, या महिलेने  १०५ आयफोनसह १५ लक्झरी घड्याळी देखील लपवल्या होत्या. मात्र या महिलेची ही चोरी बाहेर आली.


११ जुलै रोजी कस्टम अधिकाऱ्यांना या महिलेच्या कपड्यांवर संशय आला. या महिलेने उकाळा होत असतानाही हिवाळ्यातील स्वेट शर्ट घातलं होतं. तिने आपल्या हातांवरही फोन बांधले होते, शरीराच्या मानाने तिचे हात मोठे दिसत होते.


यावरून कस्टम अधिकाऱ्यांचा संशय आणखी वाढल्याने अधिकाऱ्यांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. या महिलेने १०५ आयफोन आपल्या छातीला आणि कंबरेला बांधले होते, यांचं एकूण वजन ९ किलोच्या आसपास होतं.