Money Making Tips: आयुष्यात प्रत्येकाचं स्वप्न श्रीमंत होण्याचं असतं.प्रत्येक जण आयुष्यात स्थिरता येण्यासाठी पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत असतो. यात काही जणांना यश येतं, तर काही जण मागे राहतात. श्रीमंतीचा योग सर्वांच्या नशिबी येतोच असं नाही. पण इंग्लंडमध्ये राहणारी कारेन पार्किन (Karen Parkin) एका रात्रीत कोट्यधीश बनली आहे. डिलिव्हरी ड्रायव्हरचं काम करणारी कारेनला यावर अजूनही विश्वास बसत नाही. तिला जुने दिवस आठवून अश्रू अनावर होत आहेत. कधी कधी रोजच्या जेवणाची भ्रांत असायची. डिलिव्हरी पोहोचवण्यासाठी गाडीत पेट्रोल भरण्यासाठी देखील पैसे नसायचे. दुसरीकडे, परिस्थिती बिकट असताना आजारपणामुळे नोकरी सोडण्याची वेळ आली. असं असताना नशिबानं साथ दिली.


कशी झाली कोट्यधीश?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारेन एका दुकानात दूध आणि ब्रेड विकत घेण्यासाठी गेली होती. तिथे एका व्यक्तीनं लॉटरीत 50 लाख रुपये जिंकल्याचं ऐकलं. त्यानंतर तिने लॉटरी खरेदी करण्याचा विचार केला. द सनमध्ये छापलेल्या बातमीनुसार महिलेने दोन लॉटरी तिकीटं विकत घेतली. पहिलं तिकिट स्क्रॅच करताच महिलेला काही सुचेनासं झालं. कारण तिला लॉटरी लागली होती. इतकंच काय तर लॉटरीत 2.8 कोटी रुपये जिंकली होती.


अरं बाप! या व्यक्तीनं केलेला स्टंट पाहून तुम्हीही व्हाल आवाक्, पाहा Video


एका झटक्यात कोट्यवधी रुपये मिळाल्याने कारेन खूश आहे. आता ती तिच्या कुटुंबासोबत विदेशात फिरण्याचा विचार करत आहे. इतकंच काही तिने एक नवी कार विकत घेतली आहे. अजूनही स्वप्नवत वाटत असल्याचं महिलेनं सांगितलं आहे.