नवी दिल्ली : रशियानं युक्रेनवर हल्ला केला आणि हा देश अक्षरश: दहशतीच्या छायेखाली आला. रशियाचा वेढा आणि मारा वाढत असताना युक्रेनियन नागरिक सर्वस्व पणाला लावून लढा देताना दिसत आहेत. त्यांना ही प्रेरणा कुठून मिळाली, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्याचं उत्तर आहे, राष्ट्रपती Volodymyr Zelenskyy यांच्याकडून. (Russia Ukraine Conflict)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाप्रतीचे त्यांचे सर्व व्हिडीओ जागतिक पातळीवर सर्वांच्या डोळ्यात पाणी आणत आहेत. तर, आंतरराष्ट्रीय न्यायालयात देशाला न्याय मिळवून देण्यासाठी धाव घेणाऱ्या Volodymyr Zelenskyy यांच्यावर संपूर्ण जगातील महिला भाळल्या आहेत.


Volodymyr Zelenskyy यांच्यासंदर्भातील फोटो, व्हिडीओ आणि ट्विट बघता बघता व्हायरल होत आहेत. हा तर माझा क्रश आहे, असं म्हणत कैक महिला युक्रेनच्या या राष्ट्रपतींच्या फोटोंना लाईक करत आहेत. 


झेलेंस्की व्हायरल होणाऱ्या या फोटोंमध्ये कुठे युद्धभूमीत दिसत आहेत तर कुठे युद्धभूमीची पाहणी करताना दिसत आहेत. 




आपल्या राष्ट्रावर झालेल्या हल्ल्याला परतवून लावताना झेलेंस्की यांनी घेतलेली ही भूमिका नेमकी तुम्हाला कशी वाटते? 


मुळात एरव्ही या अभिनेत्याची स्टाईल आणि त्या अभिनेत्याचं व्यक्तीमत्त्वं आम्लाहा आवडतं असं म्हणणाऱ्या महिला आता चक्क युक्रेनच्या राष्ट्रपतींवर Crush असल्याचं म्हणतायंत ज्यामुळं खरंच युद्धात हे जगावेगळं प्रेमही बहरतंय असं म्हमणं वावगं ठरणार नाही.