बापरे! माणूस आहे की रोबोट? चालू पंखा चक्कं जीभेने थांबवते ही महिला
सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच काही ना काही व्हिडीओ पाहात असतो जे आपल्या आश्चर्य तर करतात त्याच बरोबर आपले मनोरंजन देखील करतात.
मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच काही ना काही व्हिडीओ पाहात असतो जे आपल्या आश्चर्य तर करतात त्याच बरोबर आपले मनोरंजन देखील करतात. तर काही लोकं त्यांच्या जवळी असलेल्या कौशल्याने लोकांना हादरवून ठेवतात. कारण त्यांच्या सारखे तेच असतात. त्यांच्या सारखे कौशल्य फार कमी लोकांकडे पाहायला मिळते म्हणूनच तर असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.
असाच एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यावर तुमच्या अंगावर काटा उभा राहिल आणि तुम्ही म्हणाल की, हे कसं शक्य आहे? पण या महिलेनं ते करुन दाखवलं आहे. यासाठी या महिलेच्या नावावर गिनीज वर्ल्ड रिकॉर्डची (Guinness World Record) नोंद झाली आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला तिच्या जिभेन इलेक्ट्रिक फॅन थांबवत आहे. ती चक्कं वेगाने फिरणाऱ्या पंख्यांच्या ब्लेडला जीभ लावते आणि पंख्याला थांबवते.
हे खरोखरच खूप जोखमीचे आणि जिवावर बेतनारे आहे, कारण यामुळे या महिलेची जीभ कापली जाऊ शकते किंवा तिला शॉक देखाल लागू शकतो. परंतु तिने हे करुन देखवले आहे आणि आपल्या नावावर एक विश्वविक्राम नोदवला आहे. (Guinness World Record)
या महिलेचं नाव Zoe Ellis आहे, Zoe Ellis ने इटली मध्ये हा रिकॉर्ड केला आहे. हा रेकॉर्ड स्वत: मध्ये अद्वितीय तसेच धोकादायक देखील आहे. अर्थात यासाठी यामहिलेने अथक प्रयत्न आणि मेहनत घेतली असणार. त्यामुळे कोणीही हे आपल्या घरी करुन पाहू नये.