न्यायाधीश आणि चोर वर्ग मित्र असल्याच्या अनेक घटना तुम्ही सिनेमांमध्ये पाहिल्या असतील अथवा ऐकल्या देखील असतील. मात्र ही घटना याला अपवाद ठरतेय. कारण या घटनेत थेट महिला न्यायाधीश (Judge) आणि कैदी (Prisoner) एकमेकांच्या प्रेमात असल्याची घटना समोर आली आहे. तसेच महिला न्यायाधीश आणि कैदी जेलमध्ये त्या अवस्थेत देखील सापडले होते. ही घटना जेलच्या कॅमेरात (CCTV Camera) कैद झाली होती. त्यामुळे मोठा गदारोळ झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आश्चर्यकारक! उन्हात जाताच महिलेच्या कपड्याचा रंग बदलला, Video पाहुन तुम्हालाच धक्का बसेल


 व्हिडिओत काय? 


एका पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येप्रकऱणी आरोपीला (Prisoner) अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली होती. या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यासाठी एक न्याय़ाधीशांची कमिटी नेमण्यात आली होती. या कमिटीने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर आरोपीली फासावर लटकवायचं की नाही याबाबतचा निर्णय होणार होता.


जेलमध्ये करायचे अश्लील कृत्य 


दरम्यान न्यायाधीशांच्या कमिटीत आरोपीची प्रेमिका होती. या महिला न्यायाधीशाचे नाव मॅरीएल सुआरेझ होती. ही महिला न्यायाधीश आरोपीची चौकशी करण्याच्या बहाण्याने जेलमध्ये जायची. यावेळी जेलमध्ये एकांतात ती त्याच्यासोबत संबंध ठेवायची. एका भेटी दरम्यान तर त्याने तिला किसच केले होते. ही संपुर्ण घटना जेलच्या कॅमेरात कैद झाली होती. जेलच्या कॅमेरात कैद झालेला हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडिओने नंतर मोठा गदारोळ केला आणि महिला न्यायाधीशाच्या अडचणीत वाढ झाली होती.


हे ही वाचा : घरातल्या किचनमध्ये सापडला किंग कोब्रा,अन् कुटुंबियांची पळता भुई थोडी झाली!पाहा VIDEO 


पोलिस अधिकारी लिआंद्रो ‘टिटो’ रॉबर्ट्सच्या हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यासाठी एक न्यायाधीशांची एक कमिटी गठीत करण्यात आली होती.या न्यायाधीशांच्या पॅनेलचा मॅरीएल भाग होती. त्या पॅनेलमध्ये ती एकमेव न्यायाधीश होती, जिनं आरोपीला जन्मठेपेच्या विरोधात मतदान केलं होतं. दुसरीकडे तो एक अत्यंत धोकादायक कैदी आहे, असे असतानाही मॅरिएलनं त्याच्या जन्मठेपेच्या विरोधात मतदान केलं होतं.'


हे ही वाचा : 'या' तरूणीने स्टाईलमध्ये Urfi Javed लाही सोडलं मागे, पाहा VIDEO


दरम्यान मॅरिएलच्या प्रियकराला जन्मठेपेची (Prisoner) शिक्षा सुनावण्यात आली. या घटनेनंतर महिला न्यायाधीशाला (Judge) आरोपीला वाचवल्याप्रकरणी अनेक सवाल उपस्थित करण्यात आले.तिला तिच्या या वागणुकीबद्दल विचारलं असता, आपण केसविषयी चर्चा करण्यासाठी त्याच्याकडे गेल्याचे तिने सांगितले. तसेच त्याच्यावर एक पुस्तक लिहिणार असल्याचा तिने म्हटलं. मात्र चौकशी अधिकाऱ्यांनी तिचं उत्तर रूचलं नाही आणि त्यांनी अयोग्य वर्तनाप्रकरणी तिच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही केली. अर्जटीनामध्ये ही घटना घडली होती. या घटनेने न्य़ायव्यवस्थेला मोठा धक्का बसला होता.