मुंबई : पाकिस्तानात एक अजब प्रकार घडला आहे. विमानतळावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पाकिस्तानी झेंडा लावलेल्या महिलेला टोपी घालताना एका महिलेला गाणं बोलताना पाहिलं. ही महिला कर्मचारी भारतीय गाणं गुणगुणत असल्यामुळे तिला दंड ठोठावण्यात आला. हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल झाला आहे. ज्यानंतर अधिकाऱ्यांना तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमानतळावरील एएसएफने आचार संहिताच उल्लंघन केल्यामुळे या 25 वर्षीय महिला कर्मचारीचे वेतन दोन वर्षांसाठी थांबवण्यात आलं आहे. तसेच अधिकाऱ्यांनी तिला कठोर शब्दात सांगितले की, यापुढे ती आचार संहिताचे उल्लंघन करेल तर तिच्यावर कडक कारवाई होईल. 


विराट कोहलीची स्तुती केली म्हणून पाठवलं कारागृहात 


भारत जिथे पाकिस्तानशी प्रेमाचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तिथे पाकिस्तान यासाठी तयार नसल्याचं समोर आलं आहे. 2016 मध्ये पाकिस्तानी व्यक्तीने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचं कौतुक केलं तर त्याला शिक्षेला सामोरं जावं लागलं. या व्यक्तीने कोहलीचं कौतुक करून तिरंगा घरात लावला याकरता त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती.