मुंबई : मँचेस्टर, यूके येथून एक प्रकरण विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. जिथे एका 19 वर्षीय पुरुषावर मुलींच्या खोलीत गुपचूप प्रवेश करून त्यांचे अंतर्वस्त्र चोरल्याचा आरोप केला गेला आहे. एका मुलीने एका व्यक्तीला तिच्या खोलीतून जाताना पाहिले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. मुलीने तात्काळ पोलिसांना फोन करून या व्यक्तीला ताब्यात घेतले. 'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, मुलींच्या खोलीतून सतत अंडरगारमेंट्स चोरीला जात होते. यामुळे अस्वस्थ झालेल्या एका मुलीने एके दिवशी टॅम नावाचा व्यक्ती तिच्या खोलीतून डोकावत असल्याचे पाहिले. नंतर या मुलीने जेव्हा कपाटातील आपले अंडरगार्मेंट पाहिले, तेव्हा तिला ते कपाटात नसल्याचे आढळले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलीने हा प्रकार तिच्या मैत्रिणींना सांगितल्यावर त्यांच्यासोबतही असाच प्रकार घडल्याचे समोर आले. त्यानंतर या मुलींच्या शंकेचे रूपांतर विश्वासात बदलले आणि त्यांच्या लक्षात आले की, त्यांचे कपडे चोरीला जाण्यामागे टॅमशिवाय अन्य कोणीही नाही. त्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली आणि त्यानंतर टॅमला अटक करण्यात आली.


पोलिसांनी चौकशीत केली असता टॅमने आपला गुन्हा मान्य केला आणि माफीही मागितली. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली, जिथे टॅमला चोरीच्या दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले. त्याला 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली.


२० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान चोरीच्या या घटना घडत होत्या, त्या वेळी टॅम मँचेस्टर विद्यापीठाचा विद्यार्थी होता. किंग टॅमला परवानगीशिवाय मुलींच्या खोलीत घुसून चोरी केल्याप्रकरणी दोषी आढळले.


मिन्शुल स्ट्रीट क्राउन कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान, खरंतर टॅमला हाँगकाँगमधून आल्यानंतर "एकटे" वाटले होते. तो डिप्रेशनमध्ये गेला होता. त्यामुळे तो मुलींचे अंडरगार्मेंट चोरी करायचा असे उघड झाले. तो मानसिक रोगी होता आणि त्यामुळेच तो हे सगळं कृत्य करत असल्याचे समोर आले आहे.